S M L

यवतमाळमध्ये भरदिवसा तरूणीवर चाकूने हल्ला

15 एप्रिलयवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी येथे भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा महाविद्यालयीन परिसरातच या तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपी गणेश राठोड या मारेकर्‍याला अटक केली. जखमी मुलीवर यवतमाळच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी महाविद्यालयात निघालेल्या तरुणीशी आरोपीची बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून आरोपींने तिच्यावर चाकूनं वार केला. यावेळी इथं उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तरुणीची सुटका केली आणि मारेकर्‍याला पोलिसांच्या हवाली केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 04:28 PM IST

यवतमाळमध्ये भरदिवसा तरूणीवर चाकूने हल्ला

15 एप्रिल

यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी येथे भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा महाविद्यालयीन परिसरातच या तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपी गणेश राठोड या मारेकर्‍याला अटक केली. जखमी मुलीवर यवतमाळच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी महाविद्यालयात निघालेल्या तरुणीशी आरोपीची बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून आरोपींने तिच्यावर चाकूनं वार केला. यावेळी इथं उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तरुणीची सुटका केली आणि मारेकर्‍याला पोलिसांच्या हवाली केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close