S M L

पुण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीचं साखळी आंदोलन

15 एप्रिलपुण्यात आज शुक्रवारी शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महिलांचा स्वच्छतागृह आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवला जावा यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनी मानवी साखळीद्वारे महापालिकेला गराडा घातला होता. पुण्यामध्ये पुरूषांसाठी एकूण 500 स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. तर महिलांसाठी फक्त 180 स्वच्छतागृह आहेत. त्यामुळे महिलांसाठीची स्वच्छतागृह वाढवण्यात यावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तसेच गेल्या काही दिवसामध्ये मंगळसूत्र आणि साखळी चोरांचा धुमाकुळ सुरू आहे.हा प्रश्न सोडवून महिला सुरक्षितता वाढवावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 04:45 PM IST

पुण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीचं साखळी आंदोलन

15 एप्रिल

पुण्यात आज शुक्रवारी शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महिलांचा स्वच्छतागृह आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवला जावा यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनी मानवी साखळीद्वारे महापालिकेला गराडा घातला होता. पुण्यामध्ये पुरूषांसाठी एकूण 500 स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. तर महिलांसाठी फक्त 180 स्वच्छतागृह आहेत. त्यामुळे महिलांसाठीची स्वच्छतागृह वाढवण्यात यावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तसेच गेल्या काही दिवसामध्ये मंगळसूत्र आणि साखळी चोरांचा धुमाकुळ सुरू आहे.हा प्रश्न सोडवून महिला सुरक्षितता वाढवावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close