S M L

..आणि आई पोरकी झाली ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

अलका धुपकर, यवतमाळ15 एप्रिलविदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्य सरकारची जाहीर झालेली पॅकेजेस 2009 पर्यंतच होती.पण 2010 आणि 2011 साली शेतकर्‍यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं. अवकाळी पावसाचे एक हजार कोटीचं पॅकेज त्याला वाचवू शकलं नाही.अमोलची आई मानसिक धक्कक्यातून सावरुच शकत नाही. तिच्या 22 वर्षाच्या लेकाने शेतातच बैलाच्या दोराने गळफास लावून घेतला. अमोलच्या आईचा अबोला कुणीच दूर करु शकलं नाही. अमोलच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. त्यानंतर लहान वयातच अमोल घरचा जाणता बनला होता. दोन बहिणींची लग्न त्यानं कर्ज काढून करुन दिली. बहिणीचे संसार मार्गी लागले पण अमोलवर कर्जाचा डोंगर वाढला.आई बाप गेले की मुलं पोरकी होतात, पण पोटचा जीव गेल्यावर पोरकी झालेली माय आम्हाला दहेली तांड्यावर भेटली. तिचं पोरकेपण सरकारचं कुठल्याच पॅकेजने भरुन निघणार नाही.उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शेतकर्‍यांनी तीव्र विरोधएकीकडे शेतकर्‍यांच्या नावाने पॅकेजेस जाहीर करायची, त्यात भ्रष्टाचार करायचा तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या विरोधी कायदे बनवायचे, असा दुटप्पी कारभार सरकार करतंय. विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या शेतीचं पाणी सरकारने हिसकावून घेतलं आहे.अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरणाच्या तब्बल 60 हजार एकरच्या सिंचनाचे पाणी इंडियाबुल्स या औष्णिक प्रकल्पाला देण्यात आलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला शेतकर्‍यांनी मात्र तीव्र विरोध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 06:09 PM IST

..आणि आई पोरकी झाली ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

अलका धुपकर, यवतमाळ

15 एप्रिल

विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्य सरकारची जाहीर झालेली पॅकेजेस 2009 पर्यंतच होती.पण 2010 आणि 2011 साली शेतकर्‍यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं. अवकाळी पावसाचे एक हजार कोटीचं पॅकेज त्याला वाचवू शकलं नाही.

अमोलची आई मानसिक धक्कक्यातून सावरुच शकत नाही. तिच्या 22 वर्षाच्या लेकाने शेतातच बैलाच्या दोराने गळफास लावून घेतला. अमोलच्या आईचा अबोला कुणीच दूर करु शकलं नाही. अमोलच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. त्यानंतर लहान वयातच अमोल घरचा जाणता बनला होता. दोन बहिणींची लग्न त्यानं कर्ज काढून करुन दिली. बहिणीचे संसार मार्गी लागले पण अमोलवर कर्जाचा डोंगर वाढला.

आई बाप गेले की मुलं पोरकी होतात, पण पोटचा जीव गेल्यावर पोरकी झालेली माय आम्हाला दहेली तांड्यावर भेटली. तिचं पोरकेपण सरकारचं कुठल्याच पॅकेजने भरुन निघणार नाही.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध

एकीकडे शेतकर्‍यांच्या नावाने पॅकेजेस जाहीर करायची, त्यात भ्रष्टाचार करायचा तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या विरोधी कायदे बनवायचे, असा दुटप्पी कारभार सरकार करतंय. विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या शेतीचं पाणी सरकारने हिसकावून घेतलं आहे.अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरणाच्या तब्बल 60 हजार एकरच्या सिंचनाचे पाणी इंडियाबुल्स या औष्णिक प्रकल्पाला देण्यात आलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला शेतकर्‍यांनी मात्र तीव्र विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close