S M L

सचिनची सेंचुरी पण कोचीचा विजय

15 एप्रिलआयपीएलमध्ये कोची टस्कर्सने मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने पराभव केला आहे. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या मॅचमध्ये कोचीने मुंबईवर 8 विकेट आणि 8 बॉल राखून विजय मिळवला. कॅप्टन सचिन तेंडुलकरच्या नॉटआऊट सेंच्युरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 2 विकेट गमावत 182 रन्स केले. याला कोची टस्कर्सनंही दमदार उत्तर दिलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली. मास्टर ब्लास्टर सेंच्युरीसचिन तेंडुलकर आणि सेंच्युरी हे आता जणू समीकरणच बनलं आहे. टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी नावावर असणार्‍या सचिन तेंडुलकरने आता आयपीएलमध्येही सेंच्युरी ठोकली आहे. कोची टस्कर्सविरुध्दच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने कॅप्टन इनिंग खेळत नॉटआऊट सेंच्युरी केली. वानखेडे मैदानावर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सचिनकडून सेंच्युरीची अपेक्षा बाळगली जात होती. पण क्रिकेटप्रेमींची ही इच्छा त्याने आयपीएलमध्ये पूर्ण केली. आयपीएलच्या गेल्या तीन हंगामात सचिनला एकही सेंच्युरी करता आली नव्हती. नॉटआऊट 89 हा त्याचा सर्वाधिक स्कोर होता. पण चौथ्या हंगामात त्याने सेंच्युरीचा रेकॉर्डही पूर्ण केला. या मॅचमध्ये सचिनने अवघ्या 66 बॉलमध्ये तब्बल 12 फोर आणि 3 सिक्सची बरसात करत नॉटआऊट शंभर रन्स केले. सेंच्युरीबरोबर सचिनने ऑरेंज कॅपचाही मान पटकावला आहे. याआधी ऑरेंज कॅप कोलकाताचा जॅक कॅलिसकडे होती. पण आता सचिननं कॅलिसलाही मागे टाकलंय.गेल्या तीन मॅचमध्ये सचिनने 201 रन्स केले आहेत. विशेष म्हणजे या तीनही मॅचमध्ये सचिन नॉटआऊट राहिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 06:39 PM IST

सचिनची सेंचुरी पण कोचीचा विजय

15 एप्रिल

आयपीएलमध्ये कोची टस्कर्सने मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने पराभव केला आहे. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या मॅचमध्ये कोचीने मुंबईवर 8 विकेट आणि 8 बॉल राखून विजय मिळवला. कॅप्टन सचिन तेंडुलकरच्या नॉटआऊट सेंच्युरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 2 विकेट गमावत 182 रन्स केले. याला कोची टस्कर्सनंही दमदार उत्तर दिलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली.

मास्टर ब्लास्टर सेंच्युरी

सचिन तेंडुलकर आणि सेंच्युरी हे आता जणू समीकरणच बनलं आहे. टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी नावावर असणार्‍या सचिन तेंडुलकरने आता आयपीएलमध्येही सेंच्युरी ठोकली आहे. कोची टस्कर्सविरुध्दच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने कॅप्टन इनिंग खेळत नॉटआऊट सेंच्युरी केली. वानखेडे मैदानावर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सचिनकडून सेंच्युरीची अपेक्षा बाळगली जात होती. पण क्रिकेटप्रेमींची ही इच्छा त्याने आयपीएलमध्ये पूर्ण केली.

आयपीएलच्या गेल्या तीन हंगामात सचिनला एकही सेंच्युरी करता आली नव्हती. नॉटआऊट 89 हा त्याचा सर्वाधिक स्कोर होता. पण चौथ्या हंगामात त्याने सेंच्युरीचा रेकॉर्डही पूर्ण केला. या मॅचमध्ये सचिनने अवघ्या 66 बॉलमध्ये तब्बल 12 फोर आणि 3 सिक्सची बरसात करत नॉटआऊट शंभर रन्स केले.

सेंच्युरीबरोबर सचिनने ऑरेंज कॅपचाही मान पटकावला आहे. याआधी ऑरेंज कॅप कोलकाताचा जॅक कॅलिसकडे होती. पण आता सचिननं कॅलिसलाही मागे टाकलंय.गेल्या तीन मॅचमध्ये सचिनने 201 रन्स केले आहेत. विशेष म्हणजे या तीनही मॅचमध्ये सचिन नॉटआऊट राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close