S M L

बीड जिल्ह्यातील पीडित मुलीचा मृत्यू

17 एप्रिलबीड येथील शेतमजूराच्या अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू झाला. आपल्याकडचं काम सोडलं म्हणून शेतमजूराच्या मुलीवर सुरमापुरी गावचा माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या बाबूलाल रसाळ याने तिचं अपहरण करून या नराधमानं तिच्यावर सतत आठ दिवस बलात्कार केला. त्यामुळे उद्‌धस्त झालेल्या या मुलीनं मागील रविवारी स्वत:ला जाळून घेतलं. यात ती 90 टक्के भाजली होती. तिचा आज शनिवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नराधम बाबूलाल रसाळचा भाऊ हा सध्या सरपंच आहे. राजकीय वरदहस्त असल्यानं आता हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो. या गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून धोका असल्याने आपल्याला पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. पोलिसांनी बाबूलाल रसाळ आणि नारायण काळे या आरोपींना आधीच अटक केली आहे. त्यांना फाशीच द्या अशी मागणीही या कुटुंबानं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 09:25 AM IST

बीड जिल्ह्यातील पीडित मुलीचा मृत्यू

17 एप्रिल

बीड येथील शेतमजूराच्या अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू झाला. आपल्याकडचं काम सोडलं म्हणून शेतमजूराच्या मुलीवर सुरमापुरी गावचा माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या बाबूलाल रसाळ याने तिचं अपहरण करून या नराधमानं तिच्यावर सतत आठ दिवस बलात्कार केला. त्यामुळे उद्‌धस्त झालेल्या या मुलीनं मागील रविवारी स्वत:ला जाळून घेतलं. यात ती 90 टक्के भाजली होती. तिचा आज शनिवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

नराधम बाबूलाल रसाळचा भाऊ हा सध्या सरपंच आहे. राजकीय वरदहस्त असल्यानं आता हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो. या गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून धोका असल्याने आपल्याला पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. पोलिसांनी बाबूलाल रसाळ आणि नारायण काळे या आरोपींना आधीच अटक केली आहे. त्यांना फाशीच द्या अशी मागणीही या कुटुंबानं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close