S M L

महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेशाला आजपासून अंमलबजावणी

16 एप्रिलकोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेश निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे. काल शुक्रवारी या संदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देवस्थानचे पुजारी, देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरात महिलांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला. आजपासून हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे. आज मनसे आमदार राम कदम यांनी मंदिर गाभार्‍यात जाऊन सपत्नीक अभिषेक केला.महालक्ष्मी मंदिर गाभार्‍यात महिलांना आता प्रवेश करता येणार आहे. एवढंच नाही तर यामुळे आता महिलांना महालक्ष्मीचा अभिषेकही करता येणार आहे. आजपासून या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सगळ्यात आधी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभा सभागृहात ही मागणी केली. बुधवारी भाजपच्या महिला आघाडीने धडक प्रवेश करत बंदी मोडून काढली. तर राम कदमांच्या नेतृत्त्वाखाली मनसे महिला आघाडीने मंदिर गाभार्‍यात धडक प्रवेश केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 03:59 PM IST

महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेशाला आजपासून अंमलबजावणी

16 एप्रिल

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभारा प्रवेश निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे. काल शुक्रवारी या संदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देवस्थानचे पुजारी, देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरात महिलांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला. आजपासून हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे. आज मनसे आमदार राम कदम यांनी मंदिर गाभार्‍यात जाऊन सपत्नीक अभिषेक केला.

महालक्ष्मी मंदिर गाभार्‍यात महिलांना आता प्रवेश करता येणार आहे. एवढंच नाही तर यामुळे आता महिलांना महालक्ष्मीचा अभिषेकही करता येणार आहे. आजपासून या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सगळ्यात आधी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभा सभागृहात ही मागणी केली. बुधवारी भाजपच्या महिला आघाडीने धडक प्रवेश करत बंदी मोडून काढली. तर राम कदमांच्या नेतृत्त्वाखाली मनसे महिला आघाडीने मंदिर गाभार्‍यात धडक प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close