S M L

जलनिती विधेयक हे युतीच अपत्यं - तटकरे

16 एप्रिलजलनिती विधेयक आज जरी संमत झालं असलं, तरी हे युती सरकारचंच अपत्यं असल्याचं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांंनी म्हटलं आहे. 2003 मध्ये जलनितीत बदल सुचवण्यासाठी युती सरकारने एक समिती नेमली होती. त्यानुसार यात बदल करण्यात आले होते. आधी पिण्यासाठी, मग उद्योगासाठी आणि त्यानंतर शेतीसाठी पाणी राखून ठेवण्यात आलं. पूर्वी पाणीवाटपाचे अधिकार जलप्राधिकरणाला देण्यात आले होते. नवीन विधेयकाप्रमाणे हे अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या मंत्रिगटाकडे देण्यात आले, एवढाच फरक करण्यात आला. त्यामुळे शेतीचं पाणी पळवण्याचा प्रश्नच येत नाही असा बचावाचा खुलासाही तटकरेंनी केला. नव्या जलनितीत शेतीचं आणि पिण्याचे पाणी पळवून उद्योगांना देण्यात येतंय, असा आरोप होतोय त्यावर तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 10:12 AM IST

जलनिती विधेयक हे युतीच अपत्यं - तटकरे

16 एप्रिल

जलनिती विधेयक आज जरी संमत झालं असलं, तरी हे युती सरकारचंच अपत्यं असल्याचं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांंनी म्हटलं आहे. 2003 मध्ये जलनितीत बदल सुचवण्यासाठी युती सरकारने एक समिती नेमली होती. त्यानुसार यात बदल करण्यात आले होते. आधी पिण्यासाठी, मग उद्योगासाठी आणि त्यानंतर शेतीसाठी पाणी राखून ठेवण्यात आलं. पूर्वी पाणीवाटपाचे अधिकार जलप्राधिकरणाला देण्यात आले होते. नवीन विधेयकाप्रमाणे हे अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या मंत्रिगटाकडे देण्यात आले, एवढाच फरक करण्यात आला. त्यामुळे शेतीचं पाणी पळवण्याचा प्रश्नच येत नाही असा बचावाचा खुलासाही तटकरेंनी केला. नव्या जलनितीत शेतीचं आणि पिण्याचे पाणी पळवून उद्योगांना देण्यात येतंय, असा आरोप होतोय त्यावर तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close