S M L

वाळू तस्कर आणि नेत्यांचे संबंध महसूलमंत्र्यांना मान्य !

16 एप्रिलवाळू तस्करांना राजकीय नेत्यांचा विशेषत:आमदारांचाच पाठिंबा आहे. त्यामुळे अवैध वाळू-उपसा करणार्‍यांना राजकीय नेत्यांनी संरक्षण देऊ नये अस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. वाळू - तस्करांवर राजकीय नेत्यांचा विशेष करून आमदारांचा वरदहस्त असतो असे आरोप वारंवार झाले आहेत. पण आता थेट महसूलमंत्र्यांनीच नेत्यांना हे आवाहन केलं आहे. त्यामुळेच या मुजोर झालेल्या वाळू तस्करांचे संबंध किती खोलवर पोहोचले आहेत, ते स्पष्ट होतंय. वाळू तस्कर राजकीय नेत्यांशी संबंध वाढवून त्याचा उपयोग करून घेतात. नेत्यांनी यांना संरक्षण नाकारलं तर 50 टक्के अवैध वाळू उपसा बंद होईल असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 02:34 PM IST

वाळू तस्कर आणि नेत्यांचे संबंध महसूलमंत्र्यांना मान्य !

16 एप्रिल

वाळू तस्करांना राजकीय नेत्यांचा विशेषत:आमदारांचाच पाठिंबा आहे. त्यामुळे अवैध वाळू-उपसा करणार्‍यांना राजकीय नेत्यांनी संरक्षण देऊ नये अस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. वाळू - तस्करांवर राजकीय नेत्यांचा विशेष करून आमदारांचा वरदहस्त असतो असे आरोप वारंवार झाले आहेत. पण आता थेट महसूलमंत्र्यांनीच नेत्यांना हे आवाहन केलं आहे. त्यामुळेच या मुजोर झालेल्या वाळू तस्करांचे संबंध किती खोलवर पोहोचले आहेत, ते स्पष्ट होतंय. वाळू तस्कर राजकीय नेत्यांशी संबंध वाढवून त्याचा उपयोग करून घेतात. नेत्यांनी यांना संरक्षण नाकारलं तर 50 टक्के अवैध वाळू उपसा बंद होईल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close