S M L

जैतापूर प्रकल्पग्रस्त नाराज !

दिनेश केळुसकर, रत्नागिरी16 एप्रिलशिवसेनेनं जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा केली पण त्यानंतर काल मुंबईत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या प्रकल्पाचा कोणताही पुनर्विचार करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या घोषणेतली हवा निघून गेल्याची चर्चा ऐकू येऊ लागली. शिवाय सध्या प्रकल्पाच्या कपाऊंड वॉलचंही काम वेगात सुरू झालंय. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा करताना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जयराम रमेश यांनी फुकुशिमाच्या घटनेनंतर लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणतात, हे पाहा त्यांनी असं म्हटलय की फुकुशिमाच्या घटनेनंतर याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. पण या जयराम रमेश यांचाही भरवसा नाही " उद्धव ठाकरे यांची शंका खरी ठरली. रमेश यांनी प्रकल्पाबाबत कोणताही पुनर्विचार होणार नसल्याचं स्पष्ट केलं. साहजिकच रमेश यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेनं लांजा आणि राजापूरमध्ये त्यांचे पुतळे जाळले. साखरी नाटे गावातल्या मच्छिमारांनीही मोर्चा काढून याचा निषेध केला. आणि शिवसेनेनं सभेत बोलल्याप्रमाणे आता कृती करून दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तेथील स्थानिक मच्छीमार मन्सूर सोलकर म्हणतात, शिवसेनेचे कार्याध्यक्ष आमच्याकडे आले आणि आम्हाला जे वचन त्यांनी दिलं की हा प्रकल्प हद्दपार करू आमची सगळ्या मच्छीमारांची आणि शेतकर्‍यांची ही मागणी आहे की त्यांनी आपली घोषणा पूर्ण करावी. दुसरीकडे प्रकल्पाच्या ठिकाणी एनपीसीआयएलकडून प्रकल्पाच्या कंपाऊंडचं काम वेगात सुरू झालं आहे. हे काम शिवसेनेनं तातडीनं बंद पाडण्यासाठी कृती करावी अशी अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.तर जनहित समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर म्हणतात, त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते बंद करावे एका ठिकाणी सभा होते आणि दुसर्‍या ठिकाणी काम चालू राहतं हे बरोबर नाही. ते काम बंद पाडावे. शिवेसेनेनं प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र 3 किलोमीटरच्या खोदाईच काम पूर्ण झालेलं आहे. सेनेच्या जाहीर सभेत एकाही प्रकल्पग्रस्तांना त्यांची बाजू मांडायला संधी मिळाली नाही याबद्दल त्यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यातच आता जयराम रमेश यांनी सर्व शंकांना पूर्णविराम दिल्यामुळे शिवसेनेच्या राजकीय आंदोलनावर अवलंबून न राहता थेट दिल्लीत जाऊन आमरण उपोषणाचा इरादा केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 03:12 PM IST

जैतापूर प्रकल्पग्रस्त नाराज !

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

16 एप्रिल

शिवसेनेनं जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा केली पण त्यानंतर काल मुंबईत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या प्रकल्पाचा कोणताही पुनर्विचार करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या घोषणेतली हवा निघून गेल्याची चर्चा ऐकू येऊ लागली. शिवाय सध्या प्रकल्पाच्या कपाऊंड वॉलचंही काम वेगात सुरू झालंय. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा करताना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जयराम रमेश यांनी फुकुशिमाच्या घटनेनंतर लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणतात, हे पाहा त्यांनी असं म्हटलय की फुकुशिमाच्या घटनेनंतर याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. पण या जयराम रमेश यांचाही भरवसा नाही " उद्धव ठाकरे यांची शंका खरी ठरली. रमेश यांनी प्रकल्पाबाबत कोणताही पुनर्विचार होणार नसल्याचं स्पष्ट केलं. साहजिकच रमेश यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेनं लांजा आणि राजापूरमध्ये त्यांचे पुतळे जाळले. साखरी नाटे गावातल्या मच्छिमारांनीही मोर्चा काढून याचा निषेध केला. आणि शिवसेनेनं सभेत बोलल्याप्रमाणे आता कृती करून दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तेथील स्थानिक मच्छीमार मन्सूर सोलकर म्हणतात, शिवसेनेचे कार्याध्यक्ष आमच्याकडे आले आणि आम्हाला जे वचन त्यांनी दिलं की हा प्रकल्प हद्दपार करू आमची सगळ्या मच्छीमारांची आणि शेतकर्‍यांची ही मागणी आहे की त्यांनी आपली घोषणा पूर्ण करावी. दुसरीकडे प्रकल्पाच्या ठिकाणी एनपीसीआयएलकडून प्रकल्पाच्या कंपाऊंडचं काम वेगात सुरू झालं आहे. हे काम शिवसेनेनं तातडीनं बंद पाडण्यासाठी कृती करावी अशी अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.

तर जनहित समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर म्हणतात, त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते बंद करावे एका ठिकाणी सभा होते आणि दुसर्‍या ठिकाणी काम चालू राहतं हे बरोबर नाही. ते काम बंद पाडावे. शिवेसेनेनं प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र 3 किलोमीटरच्या खोदाईच काम पूर्ण झालेलं आहे.

सेनेच्या जाहीर सभेत एकाही प्रकल्पग्रस्तांना त्यांची बाजू मांडायला संधी मिळाली नाही याबद्दल त्यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यातच आता जयराम रमेश यांनी सर्व शंकांना पूर्णविराम दिल्यामुळे शिवसेनेच्या राजकीय आंदोलनावर अवलंबून न राहता थेट दिल्लीत जाऊन आमरण उपोषणाचा इरादा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close