S M L

अण्णांच्या आंदोलनामागे कोण ? - संजय राऊत

17 एप्रिलअण्णा हजारे यांच्या जन लोकपाल विधेयक आंदोलनाच्या मागचे दिग्दर्शक आणि पटकथाकार कोण असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण आता संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखाने अण्णांच्या आंदोलनासंदर्भात शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे उघड झालं आहे. ज्याप्रमाणे अमिताभ बच्चनच्या नावावर चित्रपट चालत नाहीत तर त्यासाठी चांगलं संगीत, दिग्दर्शन आणि पटकथेची आवश्यकता असते. त्याप्रमाणेच जंतरमंतरच्या आंदोलनाच्या मागेही प्लॅनिंग आहे असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 11:19 AM IST

अण्णांच्या आंदोलनामागे कोण ? - संजय राऊत

17 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या जन लोकपाल विधेयक आंदोलनाच्या मागचे दिग्दर्शक आणि पटकथाकार कोण असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण आता संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखाने अण्णांच्या आंदोलनासंदर्भात शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे उघड झालं आहे. ज्याप्रमाणे अमिताभ बच्चनच्या नावावर चित्रपट चालत नाहीत तर त्यासाठी चांगलं संगीत, दिग्दर्शन आणि पटकथेची आवश्यकता असते. त्याप्रमाणेच जंतरमंतरच्या आंदोलनाच्या मागेही प्लॅनिंग आहे असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close