S M L

पुण्यात राजा परांजपे चित्रपट महोत्सव

17 एप्रिलपुण्यात आज रविवारपासून राजा परांजपे यांचा चित्रपट महोत्सव सुरू झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. महोत्सावाचे हे दुसरे वर्ष आहे. 16 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना तरूणाई पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी चित्रयोगी राजा परांजपे हा लघुपट दाखवण्यात आला. या महोत्सवात राजा परांजपे यांचे लाखाची गोष्ट, ऊनपाऊस, गंगेत घोडं न्हालं, पुढचं पाऊल, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, तसेच जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई, पेडगावचे शहाणे हे गाजलेले सिनेमे पहायाला मिळणार आहेत. 20 एप्रिलला महोत्सवाचा समारोप होणार असून बसु चटर्जी यांना 'राजा परांजपे सन्मान' देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 11:57 AM IST

पुण्यात राजा परांजपे चित्रपट महोत्सव

17 एप्रिल

पुण्यात आज रविवारपासून राजा परांजपे यांचा चित्रपट महोत्सव सुरू झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. महोत्सावाचे हे दुसरे वर्ष आहे. 16 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना तरूणाई पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यावेळी चित्रयोगी राजा परांजपे हा लघुपट दाखवण्यात आला. या महोत्सवात राजा परांजपे यांचे लाखाची गोष्ट, ऊनपाऊस, गंगेत घोडं न्हालं, पुढचं पाऊल, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, तसेच जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई, पेडगावचे शहाणे हे गाजलेले सिनेमे पहायाला मिळणार आहेत. 20 एप्रिलला महोत्सवाचा समारोप होणार असून बसु चटर्जी यांना 'राजा परांजपे सन्मान' देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close