S M L

दिल्लीचा 3 गडी राखून विजय

17 एप्रिलकॅप्टन युवराज सिंगच्या नॉटआऊट 66 रन्सच्या खेळीमुळे पुणे वॉरिअर्सने दिल्ली पुढे विजयासाठी 188 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पुणे टीम जिंकणार असं वाटत असतानाच दिल्लीनं अक्षरशा विजय खेचून आणला. 7 विकेटच्या मोबदल्यात दिल्लीने चार चेंडू राखून हा विजय मिळवला. वेणुगोपाल राव, फिंच आणि होपनं हा विजय टीमला मिळवून दिला.पुणे टीमची बॅटिंग आज चांगलीच फॉर्मात होती. रायडर आणि स्मिथ यांनी सुरुवात झकास केली. आणि युवराज सिंगने त्यावर कळस चढवला. जेसी रायडरचा भर आज सिक्सपेक्षा फोरवरच जास्त होता. 60 रन्स त्याने केले ते 27 बॉलमध्ये. यात पाच फोर आणि पाच सिक्स त्याने मारले. ग्रॅम स्मिथनेही सुरुवात चांगली केली होती. पण अशोक दिंडाला मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो 12 रनवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन युवराज सिंगने स्कोअर 180च्या पलीकडे नेला. 66 रनवर तो नॉटआऊट राहिला. पण 32 बॉलच्या इनिंगमध्ये त्याने 5 सिक्स आणि 4 फोर मारले. दिल्लीतर्फे अशोक दिंडा आणि शाहबाझ नदीम यांनी दोन-दोन विकेट घेतल्या. दिंडाने 4 ओव्हरमध्ये 42 रन देत ग्रॅम स्मिथ आणि मोहनिश मिश्राला आऊट केलं. याला उत्तर देताना दिल्लीतर्फे डेव्हिड वॉर्नर आणि सेहवाग यांनी सुरुवात तर दणदणीत केली. सातव्या ओव्हरमध्येच 75 रनची सलामी त्यांनी करुन दिली. वॉर्नरने 28 बॉलमध्ये 46 रन केले. तर सेहवागनेही 37 रन केले ते 23 बॉलमध्येच यात त्याने सहा फोर मारले. त्यानंतर मिडल ऑर्डर खास काही करु शकली नाही. पण वेणूगोपाळ राव आणि एरॉन फ्लिंच यांनी दिल्लीला मॅच जिंकून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 02:21 PM IST

दिल्लीचा 3 गडी राखून विजय

17 एप्रिल

कॅप्टन युवराज सिंगच्या नॉटआऊट 66 रन्सच्या खेळीमुळे पुणे वॉरिअर्सने दिल्ली पुढे विजयासाठी 188 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पुणे टीम जिंकणार असं वाटत असतानाच दिल्लीनं अक्षरशा विजय खेचून आणला. 7 विकेटच्या मोबदल्यात दिल्लीने चार चेंडू राखून हा विजय मिळवला. वेणुगोपाल राव, फिंच आणि होपनं हा विजय टीमला मिळवून दिला.

पुणे टीमची बॅटिंग आज चांगलीच फॉर्मात होती. रायडर आणि स्मिथ यांनी सुरुवात झकास केली. आणि युवराज सिंगने त्यावर कळस चढवला. जेसी रायडरचा भर आज सिक्सपेक्षा फोरवरच जास्त होता. 60 रन्स त्याने केले ते 27 बॉलमध्ये. यात पाच फोर आणि पाच सिक्स त्याने मारले. ग्रॅम स्मिथनेही सुरुवात चांगली केली होती. पण अशोक दिंडाला मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो 12 रनवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन युवराज सिंगने स्कोअर 180च्या पलीकडे नेला. 66 रनवर तो नॉटआऊट राहिला. पण 32 बॉलच्या इनिंगमध्ये त्याने 5 सिक्स आणि 4 फोर मारले.

दिल्लीतर्फे अशोक दिंडा आणि शाहबाझ नदीम यांनी दोन-दोन विकेट घेतल्या. दिंडाने 4 ओव्हरमध्ये 42 रन देत ग्रॅम स्मिथ आणि मोहनिश मिश्राला आऊट केलं. याला उत्तर देताना दिल्लीतर्फे डेव्हिड वॉर्नर आणि सेहवाग यांनी सुरुवात तर दणदणीत केली. सातव्या ओव्हरमध्येच 75 रनची सलामी त्यांनी करुन दिली. वॉर्नरने 28 बॉलमध्ये 46 रन केले. तर सेहवागनेही 37 रन केले ते 23 बॉलमध्येच यात त्याने सहा फोर मारले. त्यानंतर मिडल ऑर्डर खास काही करु शकली नाही. पण वेणूगोपाळ राव आणि एरॉन फ्लिंच यांनी दिल्लीला मॅच जिंकून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close