S M L

कर्जाचं ओझ जीवावर बेतलं ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

अलका धुपकर,वाशिम18 एप्रिलयवतमाळ जिल्ह्यातील पहापळ गावात पाच मार्चला विजय गावंडे या शेतकर्‍याने आत्महत्या केली. 50 हजार रुपयाचं कर्ज त्यांच्यावर होतं. दोन वर्षाच्या नापिकीमुळे तो कर्ज फेड करु शकत नव्हता अखेर पोलीस स्टेशनच्या समोरच त्याने भल्या पहाटे विष घेतलं.वाशिम जिल्ह्यातील्या पिंपळगाव इथं संजय चौहान या बंजारा शेतकर्‍याने एक एप्रिल रोजी रात्री घरातच विष घेतलं. त्याची मुलगी फुलमा हिचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. लग्नाचा खर्च आणि शेतीचं कर्ज या तणावातून अखेर त्याने विष घेतलं. पण भरला संसार सहज सोडायला कास्तकर्‍याचं मन धजत नाही. म्हणून मग दारुची नशा करुन हे विष या शेतकर्‍याने घेतलं आणि सरकारी मदतीसाठी तो अपात्र ठरला.चांगल्या दर्जाचं आयुष्य जगणं सोडाचं केवळ पोट भरण्यासाठी जगणं हेच या शेतकर्‍यांचं आयुष्य बनलंय. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या हीच त्यांची भाषा बनली आहे. कास्तकर्‍यांच्या आत्महत्येने शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत. सरकारला त्यांची भाषा कळणारही नाही. म्हणूनच शेतकर्‍यांना संघटना आवाज देत आहे. बळ देण्याचे प्रयत्न करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 11:13 AM IST

कर्जाचं ओझ जीवावर बेतलं ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

अलका धुपकर,वाशिम

18 एप्रिल

यवतमाळ जिल्ह्यातील पहापळ गावात पाच मार्चला विजय गावंडे या शेतकर्‍याने आत्महत्या केली. 50 हजार रुपयाचं कर्ज त्यांच्यावर होतं. दोन वर्षाच्या नापिकीमुळे तो कर्ज फेड करु शकत नव्हता अखेर पोलीस स्टेशनच्या समोरच त्याने भल्या पहाटे विष घेतलं.

वाशिम जिल्ह्यातील्या पिंपळगाव इथं संजय चौहान या बंजारा शेतकर्‍याने एक एप्रिल रोजी रात्री घरातच विष घेतलं. त्याची मुलगी फुलमा हिचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. लग्नाचा खर्च आणि शेतीचं कर्ज या तणावातून अखेर त्याने विष घेतलं. पण भरला संसार सहज सोडायला कास्तकर्‍याचं मन धजत नाही. म्हणून मग दारुची नशा करुन हे विष या शेतकर्‍याने घेतलं आणि सरकारी मदतीसाठी तो अपात्र ठरला.

चांगल्या दर्जाचं आयुष्य जगणं सोडाचं केवळ पोट भरण्यासाठी जगणं हेच या शेतकर्‍यांचं आयुष्य बनलंय. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या हीच त्यांची भाषा बनली आहे. कास्तकर्‍यांच्या आत्महत्येने शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत. सरकारला त्यांची भाषा कळणारही नाही. म्हणूनच शेतकर्‍यांना संघटना आवाज देत आहे. बळ देण्याचे प्रयत्न करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close