S M L

शिवसेना बनवतेय वडा पाव ' वर्ल्ड क्लास '

9 नोव्हेंबर मुंबई विनोद तळेकर मुंबईच्या प्रसिद्ध वडापावची विक्री आता जर एखाद्या इंजिनियर किंवा मॅनेजमेंट शिकलेल्या व्यक्तीने केली तर आश्चर्य वाटायला नको. कारण शिवसेना पुरस्कृत शिववडा लवकरच बाजारात दाखल होतोय. 24 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर होणा-या समारंभात या योजनेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हिरवा कंदील दाखवतील. या योजनेसाठी वडापाव विक्रेता सेनेतर्फे नावं नोंदवली जात आहेत. या नोंदणीत अनेक उच्चशिक्षित इच्छुक तरूणांनी यासाठी अर्ज केला आहे. वडापावला एक वर्ल्ड क्लास ब्रॅण्ड बनवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद पण चांगला मिळतोय. शिववडा विक्रेतासेनेकडे आलेल्या सभासद अर्जात ग्रॅज्युएट तरुण, इंजिनियर, मॅनेजमेंटचे विद्यार्थी असे अनेक उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आपलं करिअर म्हणून हा व्यवसायच का निवडला ? असं शिववडा विक्रेता सेनेचे अध्यक्ष, संजय गुरव यांना विचारलं असता ते म्हणतात, उच्च शिक्षणानंतरही सहा ते आठ हजाराच्या नोक-या करण्यापेक्षा हे तरुण व्यवसायात आले तर त्यापेक्षाही दुप्पटीने फायदा कमवतील. त्याचबरोबर इतरांनाही रोजगार मिळेल.शिववड्याला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी शिववडा विक्रेतासेनेकडे अनेक योजना तयार आहेत. त्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या उच्चशिक्षित तरुणांचा चांगला उपयोग होणार आहे. तरुणांच्या या प्रतिसादामुळे शिववडा विक्रेतासेनेचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे आता मेहनत आणि शिक्षण यांचा योग्य समन्वय साधत शिववडा विक्रेतासेना मराठमोळ्या वड्याला जागतिक दर्जा मिळवून द्यायला सज्ज झालीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2008 01:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close