S M L

वाळू उपाश्यामुळे गुलाबी पक्ष्यांनी पाठ फिरवली !

प्राची कुलकर्णी, पुणे 18 एप्रिलपुणे जिल्ह्यातील भिगवण हे फ्लेमिंगो आणि स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघरच. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हे चित्र बदललंय. इथे सुरु असलेला अनिर्बंध वाळू उपसा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे यंदाच्या वर्षी अनेक पक्ष्यांनी भिगवणकडे पाठ फिरवली आहे. भिगवणच्या जवळच असणारे हे डिकसळ नावाचे ठिकाण म्हणजे पक्षीमित्रांची पंढरीच. दरवर्षी डिसेंबर महिन्यानंतर हे ठिकाण स्थलांतरीत पक्ष्यांनी गजबजून जातं. पण यंदा मात्र या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड म्हणतात, मी गेली 10 वर्ष इथे येतोय. दरवर्षी 50 हजार पक्षी असायचे पण यंदा मात्र फार कमी पक्षी आले आहेत. याला कारण ठरलाय तो इथे अनिर्बंधपणे चाललेला वाळू उपसा. अनेक यांत्रिक बोटी लावून सतत इथे वाळू उपसा करण्यात येतोय. हा उपसा करताना अगदी साधे नियमही धाब्यावर बसवले जातात. येथे होणारा हा वाळू उपसा असाच सुरू राहिला तर पक्ष्यांचं हे वस्तीस्थान पूर्णपणे उद्‌वस्त होईल अशी भीती निसर्गप्रेमींना वाटतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 03:50 PM IST

वाळू उपाश्यामुळे गुलाबी पक्ष्यांनी पाठ फिरवली !

प्राची कुलकर्णी, पुणे

18 एप्रिल

पुणे जिल्ह्यातील भिगवण हे फ्लेमिंगो आणि स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघरच. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हे चित्र बदललंय. इथे सुरु असलेला अनिर्बंध वाळू उपसा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे यंदाच्या वर्षी अनेक पक्ष्यांनी भिगवणकडे पाठ फिरवली आहे.

भिगवणच्या जवळच असणारे हे डिकसळ नावाचे ठिकाण म्हणजे पक्षीमित्रांची पंढरीच. दरवर्षी डिसेंबर महिन्यानंतर हे ठिकाण स्थलांतरीत पक्ष्यांनी गजबजून जातं. पण यंदा मात्र या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे.

पक्षीतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड म्हणतात, मी गेली 10 वर्ष इथे येतोय. दरवर्षी 50 हजार पक्षी असायचे पण यंदा मात्र फार कमी पक्षी आले आहेत. याला कारण ठरलाय तो इथे अनिर्बंधपणे चाललेला वाळू उपसा. अनेक यांत्रिक बोटी लावून सतत इथे वाळू उपसा करण्यात येतोय.

हा उपसा करताना अगदी साधे नियमही धाब्यावर बसवले जातात. येथे होणारा हा वाळू उपसा असाच सुरू राहिला तर पक्ष्यांचं हे वस्तीस्थान पूर्णपणे उद्‌वस्त होईल अशी भीती निसर्गप्रेमींना वाटतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close