S M L

धरणातील पाणी आधी शेतीला मग उद्योगांना मिळणार !

20 एप्रिलवादग्रस्त पाणी विधेयक मंजूर करणार्‍या राज्य सरकारने अखेर आता पाणीवापराचा प्राधान्यक्रम बदलला आहे. रात्री दीड वाजता शेतीचे पाणी उद्योगांना देण्याचे जलसंपत्ती नियमन विधेयक सरकारने घाईघाईनं मंजूर केलं होतं. यानंतर सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका झाली होती. अखेर विरोधक आणि सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर सरकारने माघार घेतली. 2003 मध्ये पाण्याचा प्राधान्यक्रम बदलण्यात आला होता. आता सरकारने पूर्वीचा प्राधान्यक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. नवीन प्राधान्यक्रमानुसार पिण्याचे पाणी, शेती आणि तिसरा औद्योगिक वापर असा क्रम ठरवण्यात आला आहे. तर जलसंपत्ती विधेयक विधानपरिषदेत सुधारणांसह मंजूर झालं आहे. पाणी वाटपासंदर्भात सरकारच्या विरोधात कोणाला अक्षेप असेल तर उच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभाही यामुळे देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2011 05:27 PM IST

धरणातील पाणी आधी शेतीला मग उद्योगांना मिळणार !

20 एप्रिल

वादग्रस्त पाणी विधेयक मंजूर करणार्‍या राज्य सरकारने अखेर आता पाणीवापराचा प्राधान्यक्रम बदलला आहे. रात्री दीड वाजता शेतीचे पाणी उद्योगांना देण्याचे जलसंपत्ती नियमन विधेयक सरकारने घाईघाईनं मंजूर केलं होतं. यानंतर सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका झाली होती. अखेर विरोधक आणि सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर सरकारने माघार घेतली. 2003 मध्ये पाण्याचा प्राधान्यक्रम बदलण्यात आला होता. आता सरकारने पूर्वीचा प्राधान्यक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. नवीन प्राधान्यक्रमानुसार पिण्याचे पाणी, शेती आणि तिसरा औद्योगिक वापर असा क्रम ठरवण्यात आला आहे. तर जलसंपत्ती विधेयक विधानपरिषदेत सुधारणांसह मंजूर झालं आहे. पाणी वाटपासंदर्भात सरकारच्या विरोधात कोणाला अक्षेप असेल तर उच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभाही यामुळे देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2011 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close