S M L

सीडीमध्ये काटछाट नाही !

21 एप्रिलजन लोकपाल बिल मसुदा समितीचे सदस्य आणि माजी कायदामंत्री शांती भूषण सीडी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. सीडीमध्ये कुठल्याही प्रकारची काटछाट किंवा बदल करण्यात आलेले नाही. असा अहवाल सरकारमान्य फॉरेन्सिक लॅबनं दिला आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या सीडीमधील सर्व संवाद सलग असल्याचे अहवालात सांगण्यात आला आहे. या सीडीमध्ये शांती भूषण, मुलायमसिंग अमरसिंग यांच्यामधील एका न्यायधिशाला 4 कोटींची लाच देण्याबाबतचा कथित संवाद आहे.शांती भूषण यांनी रविवार दि.17 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन ही सीडी म्हणजे अमरसिंग यांच्या 2006 मध्ये तयार करण्यात आलेल्या टेप्सचा भाग असल्याचा दावा शांतीभूषण यांनी केला होता. त्याचवर्षी आपले फोन टॅप केले गेल्याचा आरोप ही अमरसिंग यांनी केला होता. या सीडीतलं संभाषण संकलन करुन सादर केलं गेलं आहे. यात मुलायमसिंग यांचं संभाषण घुसवण्यात आलं आहे. असा दावाही शांतीभूषण यांनी केला होता. तसेच याप्रकरणी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका ही दाखल केली आहे. तर शांती भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. शांती भूषण यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशाप्रकारे सीडी काढण्यात आल्याची प्रतिक्रियाही अण्णा हजारे यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 09:22 AM IST

सीडीमध्ये काटछाट नाही !

21 एप्रिल

जन लोकपाल बिल मसुदा समितीचे सदस्य आणि माजी कायदामंत्री शांती भूषण सीडी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. सीडीमध्ये कुठल्याही प्रकारची काटछाट किंवा बदल करण्यात आलेले नाही. असा अहवाल सरकारमान्य फॉरेन्सिक लॅबनं दिला आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या सीडीमधील सर्व संवाद सलग असल्याचे अहवालात सांगण्यात आला आहे. या सीडीमध्ये शांती भूषण, मुलायमसिंग अमरसिंग यांच्यामधील एका न्यायधिशाला 4 कोटींची लाच देण्याबाबतचा कथित संवाद आहे.

शांती भूषण यांनी रविवार दि.17 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन ही सीडी म्हणजे अमरसिंग यांच्या 2006 मध्ये तयार करण्यात आलेल्या टेप्सचा भाग असल्याचा दावा शांतीभूषण यांनी केला होता. त्याचवर्षी आपले फोन टॅप केले गेल्याचा आरोप ही अमरसिंग यांनी केला होता. या सीडीतलं संभाषण संकलन करुन सादर केलं गेलं आहे. यात मुलायमसिंग यांचं संभाषण घुसवण्यात आलं आहे. असा दावाही शांतीभूषण यांनी केला होता. तसेच याप्रकरणी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका ही दाखल केली आहे. तर शांती भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. शांती भूषण यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशाप्रकारे सीडी काढण्यात आल्याची प्रतिक्रियाही अण्णा हजारे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close