S M L

जैतापूर प्रकल्पासाठी शिवसेनेनं सुपारी घेतली !

21 एप्रिलजैतापूर प्रकल्पाच्या निमित्तानं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेला लक्ष केलं. जैतापूर प्रकल्प झाल्यास आपले वीजेचे दर कोसळतील या भितीने 11 उद्योजकांनी हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी एका राजकीय पक्षाला 500 कोटी रुपयांची सुपारी दिली. या सुपारीचा ऍडव्हान्सही त्यापक्षाला मिळाला. त्यानंतर त्या पक्षाची 9 मार्चची नियोजित जाहीर सभा पुढे ढकलून 9 एप्रिलला ठेवण्यात आली. तसेच याच पक्षाची नेते व्हेकेशनला गेले. याआधीसुद्धा ते असेच करत आले आहेत. हा राजकीय पक्ष शिवसेनाच आहे अशी माझ्या सुत्रांची माहिती आहे. अशा शब्दात राणेंनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले. नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई उभे राहिले. नारायण राणे यांच्या आरोपात तथ्य नाही, हे बेछूट आरोप आहेत. 500 रुपयांची सुद्धा देवाण घेवाण झाली असेल तर नारायण राणेंनी सिद्ध करून दाखवावे असं आव्हान सुभाष देसाई यांनी दिलं. पण यावेळी सुभाष देसाई यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचा एखाद दुसरा आमदार वगळता शिवसेनेची फारशी उपस्थिती नव्हती.तर, नारायण राणेंना शिवसेना द्वेषाची कावीळ झाली आहे. म्हणूनच असे बेछूट आरोप करत आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 10:18 AM IST

जैतापूर प्रकल्पासाठी शिवसेनेनं सुपारी घेतली !

21 एप्रिल

जैतापूर प्रकल्पाच्या निमित्तानं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेला लक्ष केलं. जैतापूर प्रकल्प झाल्यास आपले वीजेचे दर कोसळतील या भितीने 11 उद्योजकांनी हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी एका राजकीय पक्षाला 500 कोटी रुपयांची सुपारी दिली.

या सुपारीचा ऍडव्हान्सही त्यापक्षाला मिळाला. त्यानंतर त्या पक्षाची 9 मार्चची नियोजित जाहीर सभा पुढे ढकलून 9 एप्रिलला ठेवण्यात आली. तसेच याच पक्षाची नेते व्हेकेशनला गेले. याआधीसुद्धा ते असेच करत आले आहेत. हा राजकीय पक्ष शिवसेनाच आहे अशी माझ्या सुत्रांची माहिती आहे. अशा शब्दात राणेंनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले.

नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई उभे राहिले. नारायण राणे यांच्या आरोपात तथ्य नाही, हे बेछूट आरोप आहेत. 500 रुपयांची सुद्धा देवाण घेवाण झाली असेल तर नारायण राणेंनी सिद्ध करून दाखवावे असं आव्हान सुभाष देसाई यांनी दिलं. पण यावेळी सुभाष देसाई यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचा एखाद दुसरा आमदार वगळता शिवसेनेची फारशी उपस्थिती नव्हती.

तर, नारायण राणेंना शिवसेना द्वेषाची कावीळ झाली आहे. म्हणूनच असे बेछूट आरोप करत आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close