S M L

सुप्रिया सुळेंचे गोयंकासोबत व्यावसायिक संबंध !

21 एप्रिलमराठा स्ट्राँगमन म्हणून राष्ट्रीय राजकारणात प्रसिध्द असलेल्या शरद पवार यांच्या कुटुंबीयांपुढच्या अडचणी वाढत चालल्या आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तिहार जेलमध्ये रवानगी झालेल्या विनोद गोयंकाच्या कंपनीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नसल्याचं पवार सांगत आहे. मात्र त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळेंचे विनोद गोयंकासोबत व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावेच आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहेत.गोयंका यांच्या संबंधाबद्दल कृषी मंत्री शरद पवार यांनी विचारले असता पवार म्हणतात, 'माझा विनोद गोंयका यांच्या कंपनीत एका पैशाचीही गुंतवणूक नाही. शरद पवाराचं हे उत्तर आहे. मात्र विनोद गोयंका डायरेक्टर असलेल्या ए जी मर्केटाईंलमध्ये अजित पवार स्टेकहोल्डर असल्याच्या आयबीएन लोकमतच्या गौप्यस्फोटामुळे पवार अजूनच अडचणीत सापडले आहे.दुसरीकडे पवारांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांची विनोद गोयंका यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी असल्याची कागदपत्रंच आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. पुण्याच्या मुकुंद भवन ट्रस्टने 26 हजार चौरस फूट जमीन, सुप्रिया सुळे यांच्या मालकीच्या पंचशील टेक्नालॉजी पार्कला केवळ 7 कोटी रुपयांना विकली. विनोद गोयंका या ट्रस्टवर आहे. मात्र रजिस्ट्रर ऑफ कंपनी अफेअरच्या वेबसाईटवर, सुप्रिया सुळेंच्या कंपनीकडे 92 हजार चौरस फूटांपेक्षाही जास्त जमीन असल्याचे दाखवलंय. मग ही अतिरीक्त जमीन कुणाची हा प्रश्न समोर आला आहे. याच जागेवर आता शाहीद बलवा आणि विनोद गोयंकाची डी बी रिअ ॅल्टी कंपनी फाईव्ह स्टार रिसॉर्ट बांधत आहे. या प्रकरणी भाजपनं शरद पवार यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर आता अजित पवार आणि सुप्रीया सुळे यांची विनोद गोयंका यांच्यासोबत व्यावसायिक भागादारी असल्याचे पुरावे समोर येत आहे. सध्या युपीएची परिस्थिती लक्षात घेता पवारांच्या स्थानाला सध्या तरी धक्का नाही. मात्र भ्रष्टाचाराविरुध्दचं जनमानस बघता पवारांच्या राजकारणाला पुढच्या निवडणूकामध्ये याची किंमत चूकवावी लागेल असच चित्र आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 10:50 AM IST

सुप्रिया सुळेंचे गोयंकासोबत व्यावसायिक संबंध !

21 एप्रिल

मराठा स्ट्राँगमन म्हणून राष्ट्रीय राजकारणात प्रसिध्द असलेल्या शरद पवार यांच्या कुटुंबीयांपुढच्या अडचणी वाढत चालल्या आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तिहार जेलमध्ये रवानगी झालेल्या विनोद गोयंकाच्या कंपनीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नसल्याचं पवार सांगत आहे. मात्र त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळेंचे विनोद गोयंकासोबत व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावेच आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहेत.

गोयंका यांच्या संबंधाबद्दल कृषी मंत्री शरद पवार यांनी विचारले असता पवार म्हणतात, 'माझा विनोद गोंयका यांच्या कंपनीत एका पैशाचीही गुंतवणूक नाही. शरद पवाराचं हे उत्तर आहे. मात्र विनोद गोयंका डायरेक्टर असलेल्या ए जी मर्केटाईंलमध्ये अजित पवार स्टेकहोल्डर असल्याच्या आयबीएन लोकमतच्या गौप्यस्फोटामुळे पवार अजूनच अडचणीत सापडले आहे.

दुसरीकडे पवारांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांची विनोद गोयंका यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी असल्याची कागदपत्रंच आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. पुण्याच्या मुकुंद भवन ट्रस्टने 26 हजार चौरस फूट जमीन, सुप्रिया सुळे यांच्या मालकीच्या पंचशील टेक्नालॉजी पार्कला केवळ 7 कोटी रुपयांना विकली.

विनोद गोयंका या ट्रस्टवर आहे. मात्र रजिस्ट्रर ऑफ कंपनी अफेअरच्या वेबसाईटवर, सुप्रिया सुळेंच्या कंपनीकडे 92 हजार चौरस फूटांपेक्षाही जास्त जमीन असल्याचे दाखवलंय. मग ही अतिरीक्त जमीन कुणाची हा प्रश्न समोर आला आहे. याच जागेवर आता शाहीद बलवा आणि विनोद गोयंकाची डी बी रिअ ॅल्टी कंपनी फाईव्ह स्टार रिसॉर्ट बांधत आहे. या प्रकरणी भाजपनं शरद पवार यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर आता अजित पवार आणि सुप्रीया सुळे यांची विनोद गोयंका यांच्यासोबत व्यावसायिक भागादारी असल्याचे पुरावे समोर येत आहे. सध्या युपीएची परिस्थिती लक्षात घेता पवारांच्या स्थानाला सध्या तरी धक्का नाही. मात्र भ्रष्टाचाराविरुध्दचं जनमानस बघता पवारांच्या राजकारणाला पुढच्या निवडणूकामध्ये याची किंमत चूकवावी लागेल असच चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close