S M L

अजितदादांचं आव्हान फडणवीस यांनी स्वीकारलं

22 एप्रिलरायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बिलवली धरणाजवळची जागा ए.जी मर्कंटाईल कंपनीसी देण्याच्या प्रकरणी अजित पवारांनी आपण सभागृहात म्हटल्याप्रमाणे चौकशीला तयार आहोत असं अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केलं. तसेच आपल्यावर आरोप करणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी असं आपण सांगितलं पण फडणवीसांनीच गयावया करत नको आपल्याला चुकीची कागदपत्र दिली असतील असं म्हटल्याचा दावा पुण्यात पत्रकारांसी बोलताना केला. मात्र आपण अजित पवार यांचे आव्हान स्वीकारत असून ए जी मर्कंटाईल प्रकरणाची चौकशी करण्यास आपण तयार आहोत, याबाबत माझ्या नावाच्या समितीची घोषणा केली तर निपक्ष चौकशी करेन असं आश्वासन भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आमच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2011 06:41 PM IST

अजितदादांचं आव्हान फडणवीस यांनी स्वीकारलं

22 एप्रिल

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बिलवली धरणाजवळची जागा ए.जी मर्कंटाईल कंपनीसी देण्याच्या प्रकरणी अजित पवारांनी आपण सभागृहात म्हटल्याप्रमाणे चौकशीला तयार आहोत असं अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केलं. तसेच आपल्यावर आरोप करणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी असं आपण सांगितलं पण फडणवीसांनीच गयावया करत नको आपल्याला चुकीची कागदपत्र दिली असतील असं म्हटल्याचा दावा पुण्यात पत्रकारांसी बोलताना केला. मात्र आपण अजित पवार यांचे आव्हान स्वीकारत असून ए जी मर्कंटाईल प्रकरणाची चौकशी करण्यास आपण तयार आहोत, याबाबत माझ्या नावाच्या समितीची घोषणा केली तर निपक्ष चौकशी करेन असं आश्वासन भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आमच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2011 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close