S M L

न्या. संतोष हेगडेंनी घेतली नरमाईची भूमिका

23 एप्रिलजन लोकपाल समितीच्या जनप्रतिनिधींची आज संध्याकाळी 6 वाजता नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अण्णा हजारेही दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जनप्रतिनिधींवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा होणार आहे. दिग्विजयसिंग यांच्या आरोपानंतर संतोष हेगडे यांनी लोकपाल समितीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संतोष हेगडेंनी आता नरमाईची भूमिका घेतली असून आपल्याला अण्णांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 09:26 AM IST

न्या. संतोष हेगडेंनी घेतली नरमाईची भूमिका

23 एप्रिल

जन लोकपाल समितीच्या जनप्रतिनिधींची आज संध्याकाळी 6 वाजता नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अण्णा हजारेही दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जनप्रतिनिधींवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा होणार आहे. दिग्विजयसिंग यांच्या आरोपानंतर संतोष हेगडे यांनी लोकपाल समितीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संतोष हेगडेंनी आता नरमाईची भूमिका घेतली असून आपल्याला अण्णांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close