S M L

अनिल अंबानींचे स्वान टेलिकॉमशी संबंध ; 100 कोटींचा व्यवहार

23 एप्रिलअनिल अंबानींचे स्वान टेलिकॉमशी संबंध असल्याचे संदर्भ आता समोर येत आहे. एडीएजीच्या 7 कंपन्यांनी 2006 - 07 मध्ये स्वान टेलिकॉमच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती पुढे आली. आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरने सीबीआयला याविषयीची माहिती दिली आहे. 10 कोटींपेक्षा जास्त मोठ्या रक्कमांचे व्यवहार करण्याचे अधिकार फक्त अनिल आणि टीना अंबानी यांनाच होते अशी माहिती या मॅनेजरने दिल्याचे समजतंय. अनिल अंबानींची चौकशी करताना सीबीआयने या मुद्द्या विषयी त्यांची उलट-तपासणी केल्याची माहितीही सीबीआयच्या सूत्रांकडून मिळतेय. पण अनिल अंबानींनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. असं असलं तरी या संदर्भात अजूनही कोणते ठोस पुरावे मिळाले नसल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 10:07 AM IST

अनिल अंबानींचे स्वान टेलिकॉमशी संबंध ; 100 कोटींचा व्यवहार

23 एप्रिल

अनिल अंबानींचे स्वान टेलिकॉमशी संबंध असल्याचे संदर्भ आता समोर येत आहे. एडीएजीच्या 7 कंपन्यांनी 2006 - 07 मध्ये स्वान टेलिकॉमच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती पुढे आली. आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरने सीबीआयला याविषयीची माहिती दिली आहे.

10 कोटींपेक्षा जास्त मोठ्या रक्कमांचे व्यवहार करण्याचे अधिकार फक्त अनिल आणि टीना अंबानी यांनाच होते अशी माहिती या मॅनेजरने दिल्याचे समजतंय. अनिल अंबानींची चौकशी करताना सीबीआयने या मुद्द्या विषयी त्यांची उलट-तपासणी केल्याची माहितीही सीबीआयच्या सूत्रांकडून मिळतेय. पण अनिल अंबानींनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. असं असलं तरी या संदर्भात अजूनही कोणते ठोस पुरावे मिळाले नसल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close