S M L

हर्षवर्धन पाटील आयकर खात्याच्या रडारवर !

28 एप्रिलसहकारमंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर येथील शहाजी प्रतिष्ठानला मिळत असलेल्या देणग्यांच्या व्यवहाराबाबत आयकर खात्याच्या पुण्यातील कार्यालयाकडून चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणी शहाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे हर्षवर्धन पाटील यांचीही चौकशी होणार आहे. पण हर्षवर्धन पाटील यांनी आपण आज हजर राहू शकणार नसल्याचं सांगितलं. त्यांनी उद्यापर्यंतची वेळ मागून घेतली आहे. इंदापूर इथं चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या शहाजी प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेसाठी या देणग्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश देणग्या ह्या 20 हजार रुपयंापेक्षा कमी रकमेच्या आहेत. या देणग्या बहुतांश ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी इंदापूर अर्बन बँकेत काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात काढल्या आहे. आणि इंदापूर अर्बन बँक ही हर्षवर्धन पाटील यांचीच आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्याभोवती संशय निर्माण झाला आहे. पण माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राजकीय स्वार्थापोटी हे आरोप करण्यात आले आहे असं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापुरात दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 10:26 AM IST

हर्षवर्धन पाटील आयकर खात्याच्या रडारवर !

28 एप्रिल

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर येथील शहाजी प्रतिष्ठानला मिळत असलेल्या देणग्यांच्या व्यवहाराबाबत आयकर खात्याच्या पुण्यातील कार्यालयाकडून चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणी शहाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे हर्षवर्धन पाटील यांचीही चौकशी होणार आहे. पण हर्षवर्धन पाटील यांनी आपण आज हजर राहू शकणार नसल्याचं सांगितलं. त्यांनी उद्यापर्यंतची वेळ मागून घेतली आहे.

इंदापूर इथं चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या शहाजी प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेसाठी या देणग्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश देणग्या ह्या 20 हजार रुपयंापेक्षा कमी रकमेच्या आहेत. या देणग्या बहुतांश ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी इंदापूर अर्बन बँकेत काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात काढल्या आहे. आणि इंदापूर अर्बन बँक ही हर्षवर्धन पाटील यांचीच आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्याभोवती संशय निर्माण झाला आहे. पण माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राजकीय स्वार्थापोटी हे आरोप करण्यात आले आहे असं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापुरात दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close