S M L

सत्यसाईबाबांनी मृत्यूपत्र तयार केलं नाही !

28 एप्रिलसत्यसाईबाबांनी मृत्यूपत्र तयार केलं नसल्याचं सत्यसाईबाबा ट्रस्टच्या सदस्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यानंतर सर्व कार्य ट्रस्ट सुरु ठेवणार असणार आहे असं ही त्यांनी सांगितलं. सत्यसाईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ट्रस्टचा वारसदार कोण, यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांनी पुट्टपर्थी इथं पत्रकार परिषद घेतली. यात ट्रस्टचे सदस्य माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती, वेणू श्रीनीवासन, आर. जे. रत्नाकर उपस्थित होते. सत्य साईबाबा ट्रस्टला विनाकारण बदमान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ट्रस्टच्या मालमत्तेची किमंत वाढवून दाखवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 12:17 PM IST

सत्यसाईबाबांनी मृत्यूपत्र तयार केलं नाही !

28 एप्रिल

सत्यसाईबाबांनी मृत्यूपत्र तयार केलं नसल्याचं सत्यसाईबाबा ट्रस्टच्या सदस्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यानंतर सर्व कार्य ट्रस्ट सुरु ठेवणार असणार आहे असं ही त्यांनी सांगितलं. सत्यसाईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ट्रस्टचा वारसदार कोण, यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांनी पुट्टपर्थी इथं पत्रकार परिषद घेतली.

यात ट्रस्टचे सदस्य माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती, वेणू श्रीनीवासन, आर. जे. रत्नाकर उपस्थित होते. सत्य साईबाबा ट्रस्टला विनाकारण बदमान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ट्रस्टच्या मालमत्तेची किमंत वाढवून दाखवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close