S M L

नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन 2 महिलांना अटक

28 एप्रिलनक्षल चळवळीशी संबंधित असल्याच्या आरो़पावरुन राज्य एटीएसने ठाणे आणि पुण्यातून दोन महिलांना अटक केली आहे. अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके अशी या दोघींची नावं आहेत. 25 एप्रिल रोजी पहिल्यांदा ठाणे येथून अँजला हिला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार पोलिसांनी तिच्या पुण्यातील राहत्या घरावर छापा टाकला असता तिथून सुषमा रामटेके या तरुणीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडे नक्षलवादी चळवळीशी संबधित साहित्य सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे. अँजला हिच्याविरोधात 20 गुन्ह्यांची नांेद आहे. सध्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याची अँजला ही पत्नी आहे. या दोघींना 3 मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 12:57 PM IST

नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन 2 महिलांना अटक

28 एप्रिल

नक्षल चळवळीशी संबंधित असल्याच्या आरो़पावरुन राज्य एटीएसने ठाणे आणि पुण्यातून दोन महिलांना अटक केली आहे. अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके अशी या दोघींची नावं आहेत. 25 एप्रिल रोजी पहिल्यांदा ठाणे येथून अँजला हिला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार पोलिसांनी तिच्या पुण्यातील राहत्या घरावर छापा टाकला असता तिथून सुषमा रामटेके या तरुणीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडे नक्षलवादी चळवळीशी संबधित साहित्य सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे. अँजला हिच्याविरोधात 20 गुन्ह्यांची नांेद आहे. सध्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याची अँजला ही पत्नी आहे. या दोघींना 3 मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close