S M L

लोकलेखा समितीत गोंधळ; सैफुद्दीन सोझ अध्यक्षपदी

28 एप्रिल2 जी घोटाळ्याप्रकरणाच्या अहवालावरून लोकलेखा समितीत राजकीय संघर्ष शिगेला पोहचला. अहवालाला काँग्रेस, बहुजन समाज आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी बैठकीत तीव्र विरोध केला. यावरून बैठकीत वाद सुरू झाल्याने अध्यक्ष मुरली मनोहर जोशींनी सभात्याग केला. त्यानंतर त्यांना हटवत काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांची यूपीएच्या सदस्यांनी अध्यक्षपदी नियुक्ती केली.2 जी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या लोकलेखा समितीची बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली. बैठकीला 21 सदस्य उपस्थित होते. काँग्रेसचे 7, द्रमुकचे 2, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य बैठकीला हजर होता. त्यांनी लोकलेखा समितीचा अहवाल नाकारला. तसं पत्र त्यांनी समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांना दिलं. हा अहवाल सरकारला अस्थिर करण्यासाठी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. अहवालाचा मसुदा कसा फुटला याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. दुपारी दोन वाजता समितीने लंच ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांनी अहवाल मतदानाला ठेवण्याची मागणी केली. यामुळे बैठकीत वाद सुरू झाला. पक्षाच्या आधारावर समितीत फूट पडली. मुरली मनोहर जोशींनी सभात्याग केला. त्यानंतर यूपीएच्या 11 सदस्यांनी सैफुद्दीन सोझ यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचा दावा केला. आणि अहवाल फेटाळून लावला.या अनपेक्षित घडलेल्या घटनांच्या वैधतेवर एनडीएनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मुरली मनोहर जोशी यांनीही या नियुक्तीला विरोध केला. त्यांनी म्हटलंय, 'विद्यमान अध्यक्ष जर अनफीट असतील किंवा बैठकीत भाग घ्यायला असमर्थ असतील, तरच नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. सदस्यांच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा मी विचार करेन आणि त्यानंतर योग्य निर्णय घेईन.'पण या अहवालाचे आता काय होणार तो लोकसभेच्या सचिवालयापर्यंत जाईल की नाही आणि 2 जी घोटाळ्याच्या तपासाचे काय होईल हा खरा प्रश्न आहे. दरम्यान मुरली मनोहर जोशी म्हणतात, 'विद्यमान अध्यक्ष जर अनफीट असतील किंवा बैठकीत भाग घ्यायला असमर्थ असतील, तरच नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. सदस्यांच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा मी विचार करेन आणि त्यानंतर योग्य निर्णय घेईन.'

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 11:43 AM IST

लोकलेखा समितीत गोंधळ; सैफुद्दीन सोझ अध्यक्षपदी

28 एप्रिल

2 जी घोटाळ्याप्रकरणाच्या अहवालावरून लोकलेखा समितीत राजकीय संघर्ष शिगेला पोहचला. अहवालाला काँग्रेस, बहुजन समाज आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी बैठकीत तीव्र विरोध केला. यावरून बैठकीत वाद सुरू झाल्याने अध्यक्ष मुरली मनोहर जोशींनी सभात्याग केला. त्यानंतर त्यांना हटवत काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांची यूपीएच्या सदस्यांनी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

2 जी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या लोकलेखा समितीची बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली. बैठकीला 21 सदस्य उपस्थित होते. काँग्रेसचे 7, द्रमुकचे 2, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य बैठकीला हजर होता. त्यांनी लोकलेखा समितीचा अहवाल नाकारला.

तसं पत्र त्यांनी समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांना दिलं. हा अहवाल सरकारला अस्थिर करण्यासाठी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. अहवालाचा मसुदा कसा फुटला याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. दुपारी दोन वाजता समितीने लंच ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांनी अहवाल मतदानाला ठेवण्याची मागणी केली.

यामुळे बैठकीत वाद सुरू झाला. पक्षाच्या आधारावर समितीत फूट पडली. मुरली मनोहर जोशींनी सभात्याग केला. त्यानंतर यूपीएच्या 11 सदस्यांनी सैफुद्दीन सोझ यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचा दावा केला. आणि अहवाल फेटाळून लावला.

या अनपेक्षित घडलेल्या घटनांच्या वैधतेवर एनडीएनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मुरली मनोहर जोशी यांनीही या नियुक्तीला विरोध केला. त्यांनी म्हटलंय, 'विद्यमान अध्यक्ष जर अनफीट असतील किंवा बैठकीत भाग घ्यायला असमर्थ असतील, तरच नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. सदस्यांच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा मी विचार करेन आणि त्यानंतर योग्य निर्णय घेईन.'

पण या अहवालाचे आता काय होणार तो लोकसभेच्या सचिवालयापर्यंत जाईल की नाही आणि 2 जी घोटाळ्याच्या तपासाचे काय होईल हा खरा प्रश्न आहे. दरम्यान मुरली मनोहर जोशी म्हणतात, 'विद्यमान अध्यक्ष जर अनफीट असतील किंवा बैठकीत भाग घ्यायला असमर्थ असतील, तरच नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. सदस्यांच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांचा मी विचार करेन आणि त्यानंतर योग्य निर्णय घेईन.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close