S M L

दिल्लीला पराभवाचा दे धक्काच ; कोलकाता जिंकली

28 एप्रिलआयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवचा आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीवर 17 रन्सनं मात केली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या भारताच्या यशस्वी ओपनिंग जोडीतली लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेर गौतम गंभीरने बाजी मारली. पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सने 7 विकेट गमावत 148 रन्स केले. याला उत्तर देताना दिल्लीची टीम 9 विकेट गमावत 131 रन्स करु शकली. वीरेंद्र सेहवाग वगळता दिल्लीचे इतर बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. दिल्लीचा सात मॅचमधील हा तब्बल 5 वा पराभव ठरला आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम एकट्या सेहवागवर अवलंबून आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. इतर बॅट्समनच्या कामगिरीत सातत्य नसल्याने टीमला पुन्हा एकदा याचा फटका बसला. डेव्हिड वॉर्नरबरोबरच प्रमुख बॅट्समन पुन्हा एकदा झटपट आऊट झाले.वीरेंद्र सेहवागने फटकेबाजी करत स्कोर हलता ठेवला. 25 बॉलमध्ये सेहवागने 5 फोर आणि 1 सिक्स मारत 34 रन्स केले. पण धोकायदायक वाटणार्‍या सेहवागचा अडसर जयदेव उनाडकतने दूर केला. कोलकातातर्फे इक्बाल अब्दुल्ला सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. अब्दुल्लाने 4 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. तर बालाजीने 2 विकेट घेत अब्दुल्लाला चांगली साथ दिली. कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातही खराब झाली. ओपनिंगला आलेला जॅक कॅलिस झटपट आऊट झाला. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला कॅप्टन गौतम गंभीर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पण नाईट रायडर्सचे युवा खेळाडू मात्र चमकले. श्रीवस्त गोस्वामी आणि मनोज तिवारीने नाईट रायडर्सची इनिंग सावरली. गोस्वामीने 22 रन्स केले. तर मनोज तिवारीने शानदार हाफसेंच्युरी ठोकत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. तिवारी 61 रन्सवर नॉटआऊट राहिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 06:12 PM IST

दिल्लीला पराभवाचा दे धक्काच ; कोलकाता जिंकली

28 एप्रिल

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवचा आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीवर 17 रन्सनं मात केली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या भारताच्या यशस्वी ओपनिंग जोडीतली लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेर गौतम गंभीरने बाजी मारली.

पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सने 7 विकेट गमावत 148 रन्स केले. याला उत्तर देताना दिल्लीची टीम 9 विकेट गमावत 131 रन्स करु शकली. वीरेंद्र सेहवाग वगळता दिल्लीचे इतर बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. दिल्लीचा सात मॅचमधील हा तब्बल 5 वा पराभव ठरला आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम एकट्या सेहवागवर अवलंबून आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. इतर बॅट्समनच्या कामगिरीत सातत्य नसल्याने टीमला पुन्हा एकदा याचा फटका बसला. डेव्हिड वॉर्नरबरोबरच प्रमुख बॅट्समन पुन्हा एकदा झटपट आऊट झाले.वीरेंद्र सेहवागने फटकेबाजी करत स्कोर हलता ठेवला. 25 बॉलमध्ये सेहवागने 5 फोर आणि 1 सिक्स मारत 34 रन्स केले. पण धोकायदायक वाटणार्‍या सेहवागचा अडसर जयदेव उनाडकतने दूर केला.

कोलकातातर्फे इक्बाल अब्दुल्ला सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. अब्दुल्लाने 4 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. तर बालाजीने 2 विकेट घेत अब्दुल्लाला चांगली साथ दिली. कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातही खराब झाली. ओपनिंगला आलेला जॅक कॅलिस झटपट आऊट झाला.

तर तिसर्‍या क्रमांकावर आलेला कॅप्टन गौतम गंभीर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पण नाईट रायडर्सचे युवा खेळाडू मात्र चमकले. श्रीवस्त गोस्वामी आणि मनोज तिवारीने नाईट रायडर्सची इनिंग सावरली. गोस्वामीने 22 रन्स केले. तर मनोज तिवारीने शानदार हाफसेंच्युरी ठोकत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. तिवारी 61 रन्सवर नॉटआऊट राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close