S M L

नाशिकमध्ये पोस्टरवरून पुन्हा एकदा वाद

9 नोव्हेंबर , नाशिकमराठीच्या तापलेल्या तव्यावर स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. असंच नाशिकमध्ये एक पोस्टर पुन्हा एकदा वादाचा विषय ठरलं. पण पोलिसांच्या तत्परतेमुळे तो वाद वेळीच मिटवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या रंगात भाषण केलं. मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाचा उल्लेख करताना, त्यांनी मराठी माणसालाच दुखवलं. भाषणात मुख्यमंत्री म्हणालेमागे झालेल्या आंदोलनामुळे अनेक कामगार सोडून गेले. कंपन्या बंद पडल्या. कामगार पळवून लावणा-यांनी कामगार पुरवण्याचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.ते लोक जी कामं करतात ती कामं आपला मराठी माणूस करत नाही.मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेमकं तेच वाक्य उचललं. आणि बिहारी नेते मराठीचं वस्त्रहरण करत असल्याचं पोस्टर बिटको चौकात लावलं. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर एक उपहासिक पत्रही उत्तरेतल्या नेत्यांना लिहीलं. अर्थात हिंदीचा दुस्वास करणा-या मनसेनं यावरची भूमिका मांडली ती हिंदीतूनच.पण खरा वाद झाला तो वेगळाच. या पोस्टरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मराठीचं हे वस्त्रहरण फक्त बघत बसल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण या पोस्टर राजकरणावरून चिडले ते भुजबळांचे कार्यकर्ते. परंतु नाशिककरांच्या सुर्देवानंहा वाद चिघळण्याआधी पोलिसांनी ते पोस्टर जप्त केलं.आणि लोकांना वेठीस धरणारा एक दिवस टळला...

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2008 09:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close