S M L

आरोप सिध्द करावे शिवसेनाप्रमुखपद सोडेन !

29 एप्रिलजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत राणेंनी केलेले आरोप सिद्ध झाले तर शिवसेनाप्रमुखपद सोडेन असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे. जैतापूर आंदोलन रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही कंपन्यांकडून 500 कोटी रूपये घेतले होते असा सनसनाटी आरोप नारायण राणे यांनी केला होता. याबाबत पुरावेही सादर करू शकतो असं राणेंनी म्हटलं होतं. त्यावर या आरोपात तथ्य असू शकतं असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. या दोघांवर बाळासाहेबांनी हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी पुरावे सादर करावेत आणि पुरावे नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. असं आव्हान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका प्रसिध्द पत्रकातून दिलं आहे. बाळासाहेबांचं आव्हान"हा मुख्यमंत्री बिनडोक आहे. जैतापूर आंदोलनासंदर्भात शिवसेनेवर करण्यात आलेले आरोप मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करुन दाखवावेत. मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध केले, तर मी राजीनामा देईन.आरोप सिद्ध नाही झाले तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा"- बाळासाहेब ठाकरेदरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे सगळ्यात दुबळे मुख्यमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 01:05 PM IST

आरोप सिध्द करावे शिवसेनाप्रमुखपद सोडेन !

29 एप्रिल

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत राणेंनी केलेले आरोप सिद्ध झाले तर शिवसेनाप्रमुखपद सोडेन असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे. जैतापूर आंदोलन रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही कंपन्यांकडून 500 कोटी रूपये घेतले होते असा सनसनाटी आरोप नारायण राणे यांनी केला होता. याबाबत पुरावेही सादर करू शकतो असं राणेंनी म्हटलं होतं. त्यावर या आरोपात तथ्य असू शकतं असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. या दोघांवर बाळासाहेबांनी हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी पुरावे सादर करावेत आणि पुरावे नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. असं आव्हान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका प्रसिध्द पत्रकातून दिलं आहे.

बाळासाहेबांचं आव्हान

"हा मुख्यमंत्री बिनडोक आहे. जैतापूर आंदोलनासंदर्भात शिवसेनेवर करण्यात आलेले आरोप मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करुन दाखवावेत. मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध केले, तर मी राजीनामा देईन.आरोप सिद्ध नाही झाले तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा"- बाळासाहेब ठाकरे

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे सगळ्यात दुबळे मुख्यमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close