S M L

मुंबईच्या रॉयल विजयाची घोडदौड राजस्थानने रोखली

29 एप्रिलआयपीएलमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सची घोडदौड आज राजस्थान रॉयल्सने रोखली. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट आणि 11 बॉल राखून मात केली. ऑलराऊंड कामगिरी करणारा योहान बोथा राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. बोथाने 44 रन्सबरोबरच 3 विकेटही घेतल्या. राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या बॉलर्सने वर्चस्व गाजवले. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईला त्यांनी शंभर रन्सचा आकडाही गाठू दिला नाही. मुंबईला 8 विकेट गमावत केवळ 94 रन्स करता आले. राजस्थान टीमला विजयाचे हे माफक आव्हान पार करण्यासाठी तब्बल 19 व्या ओव्हरपर्यंत खेळावे लागले. बोथाने 44 तर रॉस टेलरने 13 रन्स करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयाबरोबरच राजस्थान पॉईंटटेबलमध्येही थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. राजस्थानच्या खात्यात आता 8 मॅचमध्ये 9 पॉईंट जमा झाले आहेत. तर मुंबईचा 7 मॅचमधील हा दुसरा पराभव ठरला आहे.आयपीएलमधल्या बलाढय समजल्या जाणार्‍या मुंबई इंडियन्सवर राजस्थानने अक्षरशा हल्लाबोल केला. बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही राजस्थानने वर्चस्व गाजवले. राजस्थानतर्फे ओपनिंगला आलेला राहुल द्रविड झटपट आऊट झाला. पण यानंतर शेन वॉट्सन आणि योहान बोथाने दुसर्‍या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशिप केली. वॉट्सनने 3 फोर आणि 1 सिक्स मारत 26 रन्स केले. योहान बोथाने 45 रन्स करत विजयाचा पाया रचला. बोथाने 39 रन्समध्ये 2 फोर आणि 1 सिक्सही मारला. राजस्थानची बॉलिंगही दमदार झाली. योहान बोथाने ऑलराऊंड कामगिरी करत राजस्थानच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. बोथाने 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स देत 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. अशोक मनेरियाने सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू या मुंबईच्या फॉर्मात असलेल्या बॅट्समनना आऊट करत राजस्थान टीमला मोठं यश मिळवून दिलं. तर अमित सिंगने डेव्हि जेकबची विकेट घेत राजस्थानला ब्रेक थ्रु मिळवून दिला. या धक्क्यातुन मग मुंबईची टीम सावरलीच नाही. मुंबईच्या एकाही बॅट्समनला 20 रन्सचा आकडाही पार करता आला नाही. कॅप्टन सचिन तेंडुलकर 7 रन्स करुन आऊट झाला. तर रोहित शर्माने फक्त 13 रन्स केले. ऍण्ड्र्यु सायमंडच्या खात्यात मुंबईतर्फे सर्वाधिक रन्स नोंदवले गेले. सायमंडने 17 रन्स केले. धडाकेबाज बॅट्समन कायरन पोलार्डच्या बॅटलाही आज लगाम बसला.15 बॉलमध्ये पोलार्डला केवळ 4 रन्स करता आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 03:25 PM IST

मुंबईच्या रॉयल विजयाची घोडदौड राजस्थानने रोखली

29 एप्रिल

आयपीएलमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सची घोडदौड आज राजस्थान रॉयल्सने रोखली. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट आणि 11 बॉल राखून मात केली. ऑलराऊंड कामगिरी करणारा योहान बोथा राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. बोथाने 44 रन्सबरोबरच 3 विकेटही घेतल्या.

राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या बॉलर्सने वर्चस्व गाजवले. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईला त्यांनी शंभर रन्सचा आकडाही गाठू दिला नाही. मुंबईला 8 विकेट गमावत केवळ 94 रन्स करता आले. राजस्थान टीमला विजयाचे हे माफक आव्हान पार करण्यासाठी तब्बल 19 व्या ओव्हरपर्यंत खेळावे लागले.

बोथाने 44 तर रॉस टेलरने 13 रन्स करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयाबरोबरच राजस्थान पॉईंटटेबलमध्येही थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. राजस्थानच्या खात्यात आता 8 मॅचमध्ये 9 पॉईंट जमा झाले आहेत. तर मुंबईचा 7 मॅचमधील हा दुसरा पराभव ठरला आहे.

आयपीएलमधल्या बलाढय समजल्या जाणार्‍या मुंबई इंडियन्सवर राजस्थानने अक्षरशा हल्लाबोल केला. बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही राजस्थानने वर्चस्व गाजवले. राजस्थानतर्फे ओपनिंगला आलेला राहुल द्रविड झटपट आऊट झाला. पण यानंतर शेन वॉट्सन आणि योहान बोथाने दुसर्‍या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशिप केली.

वॉट्सनने 3 फोर आणि 1 सिक्स मारत 26 रन्स केले. योहान बोथाने 45 रन्स करत विजयाचा पाया रचला. बोथाने 39 रन्समध्ये 2 फोर आणि 1 सिक्सही मारला. राजस्थानची बॉलिंगही दमदार झाली. योहान बोथाने ऑलराऊंड कामगिरी करत राजस्थानच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. बोथाने 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स देत 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. अशोक मनेरियाने सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू या मुंबईच्या फॉर्मात असलेल्या बॅट्समनना आऊट करत राजस्थान टीमला मोठं यश मिळवून दिलं. तर अमित सिंगने डेव्हि जेकबची विकेट घेत राजस्थानला ब्रेक थ्रु मिळवून दिला.

या धक्क्यातुन मग मुंबईची टीम सावरलीच नाही. मुंबईच्या एकाही बॅट्समनला 20 रन्सचा आकडाही पार करता आला नाही. कॅप्टन सचिन तेंडुलकर 7 रन्स करुन आऊट झाला. तर रोहित शर्माने फक्त 13 रन्स केले. ऍण्ड्र्यु सायमंडच्या खात्यात मुंबईतर्फे सर्वाधिक रन्स नोंदवले गेले. सायमंडने 17 रन्स केले. धडाकेबाज बॅट्समन कायरन पोलार्डच्या बॅटलाही आज लगाम बसला.15 बॉलमध्ये पोलार्डला केवळ 4 रन्स करता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close