S M L

नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारकडे

30 एप्रिलमुंबई नागपूरसह सर्व महापलिकांच्या अधिनियमांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या सर्व महापालिका आयुक्तांचे अधिकार वाढवण्यात आले. तसेच महापालिकांचा कारभार राज्यसरकारच्या हातात राहील यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणांना मान्यता देण्यात आली. त्यानुसार एखाद्या नगरसेवकाला अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारने स्वत:कडे घेतला आहे. तसेच गैरवर्तणूक करणार्‍या महापौर आणि उपमहापौराचं नगरसेवकपद काढून घेतलं जाईल सोबतच त्याला 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असा महत्तवाचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. अशाच प्रकारच्या अनेक सुधारणाच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांच्या अधिकारात राज्यसरकारने वाढ केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 09:58 AM IST

नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारकडे

30 एप्रिल

मुंबई नागपूरसह सर्व महापलिकांच्या अधिनियमांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या सर्व महापालिका आयुक्तांचे अधिकार वाढवण्यात आले. तसेच महापालिकांचा कारभार राज्यसरकारच्या हातात राहील यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणांना मान्यता देण्यात आली.

त्यानुसार एखाद्या नगरसेवकाला अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारने स्वत:कडे घेतला आहे. तसेच गैरवर्तणूक करणार्‍या महापौर आणि उपमहापौराचं नगरसेवकपद काढून घेतलं जाईल सोबतच त्याला 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असा महत्तवाचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. अशाच प्रकारच्या अनेक सुधारणाच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांच्या अधिकारात राज्यसरकारने वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close