S M L

सेहवागची दिल्ली जिंकली

30 एप्रिलवीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला लागलेलं पराभवाचं ग्रहण अखेर आज सुटले आहे. दिल्ली डेअरवेव्हिल्सने कोची टस्कर्स केरलावर 38 रन्सने मात केली आहे. आठ मॅचमधील दिल्लीचा हा तिसरा विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच दिल्लीने थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीने 7 विकेट गमावत 187 रन्स केले. कॅप्टन वीरेंद्र सेहवागने तुफान फटकेबाजी करत टीमला 150 रन्सचा टप्पा पार करुन दिला. घरच्या मैदानावर कोचीला विजयाचे हे आव्हान पेलवलं नाही. कोचीची टीम 119 रन्सवर ऑलआऊट झाली. कोचीची बॅटिंग आज सपशेल फ्लॉप ठरली. दिल्ली डेअरडेव्हिल्सची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर झटपट आऊट झाला. पण कॅप्टन वीरेंद्र सेहवाग मोठ्या खेळीच्या इराद्यानंच आज मैदानात उतरला. लौकीकाला साजेशी बॅटिंग करत त्याने फटकेबाजी तर केलीच पण टीमलाही मोठा स्कोर उभा करुन दिला. सेहवागने अवघ्या 47 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोर मारत 80 रन्स केले.दिल्लीचा ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाणला सात मॅचनंतर अखेर सुर सापडला. दिल्लीच्या या सर्वात महागड्या खेळाडूची कामगिरी फ्लॉप होत होती. पण कोचीविरुध्दच्या मॅचमध्ये इरफानने ऑलराऊंडर कामगिरी केली. इरफानने 13 रन्सची छोटी पण आक्रमक खेळी केली. अवघ्या 7 बॉलमध्येत्याने 1 फोर 1 सिक्स मारला.इरफान पठाण बॉलिंगमध्येही आज चमकला. 4 ओव्हरमध्ये त्याने 27 रन्स देत 2 विकेट घेतल्या. तर मॉर्नी मॉर्केल दिल्लीचा सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला आहे. मॉर्केलने 4 ओव्हरमध्ये 18 रन्स देत 3 विकेट घेतल्या. अजित आगरकरची बॉलिंगही आज चालली. त्याने 2 विकेट घेतल्या. कोची टस्कर्स केरलाची बॅटिंग आज पूर्ण फ्लॉप झाली. कोचीची टॉप ऑर्डर झटपट कोसळली. ब्रॅड हॉजने 27 रन्स केले.तर रविंद्र जडेजानं सर्वाधिक 31 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 02:34 PM IST

सेहवागची दिल्ली जिंकली

30 एप्रिल

वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला लागलेलं पराभवाचं ग्रहण अखेर आज सुटले आहे. दिल्ली डेअरवेव्हिल्सने कोची टस्कर्स केरलावर 38 रन्सने मात केली आहे. आठ मॅचमधील दिल्लीचा हा तिसरा विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच दिल्लीने थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीने 7 विकेट गमावत 187 रन्स केले. कॅप्टन वीरेंद्र सेहवागने तुफान फटकेबाजी करत टीमला 150 रन्सचा टप्पा पार करुन दिला. घरच्या मैदानावर कोचीला विजयाचे हे आव्हान पेलवलं नाही. कोचीची टीम 119 रन्सवर ऑलआऊट झाली. कोचीची बॅटिंग आज सपशेल फ्लॉप ठरली.

दिल्ली डेअरडेव्हिल्सची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर झटपट आऊट झाला. पण कॅप्टन वीरेंद्र सेहवाग मोठ्या खेळीच्या इराद्यानंच आज मैदानात उतरला. लौकीकाला साजेशी बॅटिंग करत त्याने फटकेबाजी तर केलीच पण टीमलाही मोठा स्कोर उभा करुन दिला. सेहवागने अवघ्या 47 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोर मारत 80 रन्स केले.

दिल्लीचा ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाणला सात मॅचनंतर अखेर सुर सापडला. दिल्लीच्या या सर्वात महागड्या खेळाडूची कामगिरी फ्लॉप होत होती. पण कोचीविरुध्दच्या मॅचमध्ये इरफानने ऑलराऊंडर कामगिरी केली. इरफानने 13 रन्सची छोटी पण आक्रमक खेळी केली. अवघ्या 7 बॉलमध्येत्याने 1 फोर 1 सिक्स मारला.

इरफान पठाण बॉलिंगमध्येही आज चमकला. 4 ओव्हरमध्ये त्याने 27 रन्स देत 2 विकेट घेतल्या. तर मॉर्नी मॉर्केल दिल्लीचा सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला आहे. मॉर्केलने 4 ओव्हरमध्ये 18 रन्स देत 3 विकेट घेतल्या. अजित आगरकरची बॉलिंगही आज चालली. त्याने 2 विकेट घेतल्या. कोची टस्कर्स केरलाची बॅटिंग आज पूर्ण फ्लॉप झाली. कोचीची टॉप ऑर्डर झटपट कोसळली. ब्रॅड हॉजने 27 रन्स केले.तर रविंद्र जडेजानं सर्वाधिक 31 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close