S M L

गिरणी कामगारांचं लाक्षणिक उपोषण

01 मे आज राज्यभरात कामगार दिनही साजरा होत आहे. पण आजही मुंबईतल्या गिरणी कामगारांना आपल्या हक्काच्या घरांसाठी संघर्ष करावा लागतोय. आज हुतात्मा स्मारकाजवळच्या जागेतच या गिरणी कामगारांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं. गिरणी कामगारांना रास्त दरात घर मिळावी अशी या कामगारांची मागणी आहे. दरम्यान भारतीय कर्मचारी संघातर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच कामगारांचाही सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबरोबरच माणिकराव ठाकरे, कामगार मंत्री विजयकुमार गावित हेही उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 09:46 AM IST

गिरणी कामगारांचं लाक्षणिक उपोषण

01 मे

आज राज्यभरात कामगार दिनही साजरा होत आहे. पण आजही मुंबईतल्या गिरणी कामगारांना आपल्या हक्काच्या घरांसाठी संघर्ष करावा लागतोय. आज हुतात्मा स्मारकाजवळच्या जागेतच या गिरणी कामगारांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं. गिरणी कामगारांना रास्त दरात घर मिळावी अशी या कामगारांची मागणी आहे.

दरम्यान भारतीय कर्मचारी संघातर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच कामगारांचाही सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबरोबरच माणिकराव ठाकरे, कामगार मंत्री विजयकुमार गावित हेही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close