S M L

वैमानिकांचा संप चिघळला ; 75 टक्के फ्लाईट्स रद्द

01 मे एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. आयसीपीए मॅनेजमेंटने संपकरी पायलटशी कोणती चर्चा केली नसल्यामुळे हा संप चिघळला आहे. या संपामुळे जवळपास 75 टक्के फ्लाईट्स रद्द करावी लागली आहेत. तर सुमारे सव्वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एअर इंडियाचे आठशे पायलट्स संपावर आहेत. मॅनेजमेंटने इतर खासगी विमान कंपन्यांचे पायलट भाडे तत्वावर घेतले आहेत. पण ही तरतूद अपुरी असल्यामुळे सर्वसामान्या प्रवाश्यांचे मात्र हाल होत आहे. तर दुसरीकडे हा संप मोडून काढण्यासाठी एस्माचा बडगा उगारला आहे. पण संपकरी पायलटस् आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 11:49 AM IST

वैमानिकांचा संप चिघळला ; 75 टक्के फ्लाईट्स रद्द

01 मे

एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. आयसीपीए मॅनेजमेंटने संपकरी पायलटशी कोणती चर्चा केली नसल्यामुळे हा संप चिघळला आहे. या संपामुळे जवळपास 75 टक्के फ्लाईट्स रद्द करावी लागली आहेत. तर सुमारे सव्वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एअर इंडियाचे आठशे पायलट्स संपावर आहेत. मॅनेजमेंटने इतर खासगी विमान कंपन्यांचे पायलट भाडे तत्वावर घेतले आहेत. पण ही तरतूद अपुरी असल्यामुळे सर्वसामान्या प्रवाश्यांचे मात्र हाल होत आहे. तर दुसरीकडे हा संप मोडून काढण्यासाठी एस्माचा बडगा उगारला आहे. पण संपकरी पायलटस् आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close