S M L

प्रशासकीय सेवेला कंटाळून अधिकार्‍यांचे रामराम सत्र

आशिष जाधव, मुंबई01 मे राज्याच्या प्रशासकीय सेवेला कंटाळून आयएएस अधिकारी राजीनामा देत आहे. दोघा वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर येत्या काही दिवसात आणखी काही सनदी अधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे आघाडी सरकारपुढच्या समस्या वाढल्या आहेत.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे मंत्रालयातील प्रशासन सुस्त झालं आहे अशी टीका होत असतानाच आता एका मागून एक आयएएस अधिकारी प्रशासकीय सेवेला रामराम करु लागले आहेत. गेल्या आठ दिवसात राज्यातल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी आणि उद्योग खात्याचे प्रधान सचिव अजिझ खान स्वेच्छा निवृत्तीवर जाण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा चिंताग्रस्त झाले आहेत.या ना त्या कारणाने प्रशासकीय सेवेला रामराम करणार्‍या अधिकार्‍यांची यादी मोठी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 16 आयएएस अधिकार्‍यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला.प्रभाकर करंदीकर, विश्वास धुमाळ, ए. रामकृष्णन, संजय उबाळे, किशोर गजभिये, व्ही. जयरत, राजीव सिन्हा, सुधा भावे, व्ही.रमणी या अधिकार्‍यांनी सेवेला रामराम ठोकला आहे. राज्यात आयएएसच्या 350 जागा मंजूर आहेत, त्यातल्या 53 जागा रिक्त आहेत. त्यामुळे केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या अधिकार्‍यांनाही परत बोलावण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरु केले आहेत. पण याविषयी सांगतानासुद्धा मुख्यमंत्री तक्रारीचा सूर लावत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 12:17 PM IST

प्रशासकीय सेवेला कंटाळून अधिकार्‍यांचे रामराम सत्र

आशिष जाधव, मुंबई

01 मे

राज्याच्या प्रशासकीय सेवेला कंटाळून आयएएस अधिकारी राजीनामा देत आहे. दोघा वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर येत्या काही दिवसात आणखी काही सनदी अधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे आघाडी सरकारपुढच्या समस्या वाढल्या आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे मंत्रालयातील प्रशासन सुस्त झालं आहे अशी टीका होत असतानाच आता एका मागून एक आयएएस अधिकारी प्रशासकीय सेवेला रामराम करु लागले आहेत. गेल्या आठ दिवसात राज्यातल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी आणि उद्योग खात्याचे प्रधान सचिव अजिझ खान स्वेच्छा निवृत्तीवर जाण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा चिंताग्रस्त झाले आहेत.

या ना त्या कारणाने प्रशासकीय सेवेला रामराम करणार्‍या अधिकार्‍यांची यादी मोठी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 16 आयएएस अधिकार्‍यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला.प्रभाकर करंदीकर, विश्वास धुमाळ, ए. रामकृष्णन, संजय उबाळे, किशोर गजभिये, व्ही. जयरत, राजीव सिन्हा, सुधा भावे, व्ही.रमणी या अधिकार्‍यांनी सेवेला रामराम ठोकला आहे. राज्यात आयएएसच्या 350 जागा मंजूर आहेत, त्यातल्या 53 जागा रिक्त आहेत. त्यामुळे केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या अधिकार्‍यांनाही परत बोलावण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरु केले आहेत. पण याविषयी सांगतानासुद्धा मुख्यमंत्री तक्रारीचा सूर लावत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close