S M L

पुण्याची मिसळ राजस्थानने फस्त केली !

01 मेआयपीएलमध्ये पुणे टीमचा आणखी एक पराभव झाला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने पुणे टीमवर 6 विकेट राखून मात केली आहे. पुणे टीमचा हा सलग 6वा पराभव ठरला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे टीमनं 143 रन्स केले. याला उत्तर देताना राजस्थानने 4 विकेट गमावत 144 रन्स केले. रॉस टेलर आणि अजिंक्य रहाणेनं राजस्थानच्या विजायवर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानच्या शेन वॉट्सन आणि राहुल द्रविडने या ओपनिंग जोडीने सुरुवात चांगली केली पण मोठा स्कोर मात्र त्यांना करता आला नाही. पण यानंतर अशोक मनेरियानं फटकेबाजी करत स्कोर वाढवला. 22 बॉलमध्ये त्याने 3 सिक्स मारत 29 रन्स केले. पुणे वॉरियर्सचा स्पीन बॉलर राहुल शर्मा आज कमालीचा यशस्वी ठरला. चार ओव्हरमध्ये त्याने केवळ 13 रन्स देत 3 विकेट घेतल्या. यात द्रविड, बोथा आणि मनेरियाचा समावेश आहे. जेसी रायडर झटपट आऊट झाला. पण ओपनिंगला आलेल्या मनिष पांडेने पुणे टीमची इनिंग सावरली. पांडेने 31 बॉलमध्ये 30 रन्स केले. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या रॉबिन उत्थप्पाने पुणे टीमतर्फे सर्वाधिक रन्स केले. उत्थप्पाने 21 बॉलमध्ये 7 फोर मारत 35 रन्स केले. तर मिथून मन्हासने 24 रन्स करत पुणे टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. राजस्थानतर्फे सिध्दार्थ त्रिवेदी यशस्वी बॉलर ठरला. त्रिवेदीने 4 ओव्हरमध्ये 28 रन्स देत 2 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 02:08 PM IST

पुण्याची मिसळ राजस्थानने फस्त केली !

01 मे

आयपीएलमध्ये पुणे टीमचा आणखी एक पराभव झाला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने पुणे टीमवर 6 विकेट राखून मात केली आहे. पुणे टीमचा हा सलग 6वा पराभव ठरला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे टीमनं 143 रन्स केले. याला उत्तर देताना राजस्थानने 4 विकेट गमावत 144 रन्स केले. रॉस टेलर आणि अजिंक्य रहाणेनं राजस्थानच्या विजायवर शिक्कामोर्तब केलं.

राजस्थानच्या शेन वॉट्सन आणि राहुल द्रविडने या ओपनिंग जोडीने सुरुवात चांगली केली पण मोठा स्कोर मात्र त्यांना करता आला नाही. पण यानंतर अशोक मनेरियानं फटकेबाजी करत स्कोर वाढवला. 22 बॉलमध्ये त्याने 3 सिक्स मारत 29 रन्स केले. पुणे वॉरियर्सचा स्पीन बॉलर राहुल शर्मा आज कमालीचा यशस्वी ठरला.

चार ओव्हरमध्ये त्याने केवळ 13 रन्स देत 3 विकेट घेतल्या. यात द्रविड, बोथा आणि मनेरियाचा समावेश आहे. जेसी रायडर झटपट आऊट झाला. पण ओपनिंगला आलेल्या मनिष पांडेने पुणे टीमची इनिंग सावरली. पांडेने 31 बॉलमध्ये 30 रन्स केले. तर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या रॉबिन उत्थप्पाने पुणे टीमतर्फे सर्वाधिक रन्स केले. उत्थप्पाने 21 बॉलमध्ये 7 फोर मारत 35 रन्स केले. तर मिथून मन्हासने 24 रन्स करत पुणे टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. राजस्थानतर्फे सिध्दार्थ त्रिवेदी यशस्वी बॉलर ठरला. त्रिवेदीने 4 ओव्हरमध्ये 28 रन्स देत 2 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close