S M L

पंजाबला हरवून मुंबईची अव्वल स्थानी झेप

02 मेआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पुन्हा अव्वल स्थानावर पोहचली आहे. आज झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 23 रन्सनं पराभव केला आहे. स्पर्धेतला मुंबईचा हा सहावा विजय ठरला आहे. सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडूने केलेल्या हाफसेंच्युरीच्या जोरावर मुंबईने विजयासाठी किंग्ज इलेव्हनसमोर 160 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण किंग्ज इलेव्हनची टीम 20 ओव्हरमध्ये 8 गमावत 136 रन्सच करुन शकली. पॉल वाल्थटी आणि शॉन मार्शने किंग्ज इलेव्हनच्या विजयासाठी चांगली झुंज दिली. वाल्थटीने 33 रन्स केले. तर शॉन मार्शनं शेवटपर्यंत मैदानावर उभं रहात 61 रन्स केले. पण इतर बॅट्समनची साथ त्यांना मिळाली नाही. किंग्ज इलेव्हनचा स्पर्धेतला हा चौथा पराभव ठरला आहे. मुंबई इंडियन्सची सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू ही फॉर्मात असलेली जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली. ओपनिंगला आलेला डेव्हिड जेकब झटपट आऊट झाला. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडूने 115 रन्सची भक्कम पार्टनरशिप करत मुंबईची इनिंग सावरली.सचिन तेंडुलकरने 45 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्स मारत 51 रन्स केले. तर अंबाती रायडूनंही शानदार हाफसेच्युरी ठोकली.रायडूने 37 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्स मारत 51 रन्स केले. मुंबईच्या बॉलर्सनेही आज दमदार कामगिरी केली. मुंबईचा मुनाफ पटेल सर्वात यशस्वी बॉलर ठरला. मुनाफने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स देत 2 विकेट घेतल्या.तर हरभजन सिंगने मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन ऍडम गिलख्रिस्टची विकेट घेत मुंबईला ब्रेक थ्रु मिळवून दिला. हरभजनने 4 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 2 विकेट घेतल्या. मुंबईचा हुकमी बॉलर लसिथ मलिंगानंही 2 विकेट घेत विजयात महत्वाचा वाटा उचलला. या स्पर्धेत मलिंगाच्या नावावर आता 8 मॅचमध्ये सर्वाधिक 19 विकेटची नोंद झाली आहे. किंग्ज इलेव्हनतर्फे पॉल वाल्थटी आणि शॉन मार्शने चांगली लढत दिली. कॅप्टन गिलख्रिस्ट झटपट आऊट झाल्यावर वाल्थटी आणि मार्शने 72 रन्सची पार्टनरशिप करत विजयासाठी चांगली झुंज दिली. वाल्थटीने 2 सिक्स आणि 1 फोर मारत 33 रन्स केले. तर शार्न मार्शनं 61 रन्सची झुंजार खेळी केली पण टीमला विजय मिळवून देण्यासाठी ती अपुरी ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 02:52 PM IST

पंजाबला हरवून मुंबईची अव्वल स्थानी झेप

02 मे

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पुन्हा अव्वल स्थानावर पोहचली आहे. आज झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 23 रन्सनं पराभव केला आहे. स्पर्धेतला मुंबईचा हा सहावा विजय ठरला आहे.

सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडूने केलेल्या हाफसेंच्युरीच्या जोरावर मुंबईने विजयासाठी किंग्ज इलेव्हनसमोर 160 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण किंग्ज इलेव्हनची टीम 20 ओव्हरमध्ये 8 गमावत 136 रन्सच करुन शकली. पॉल वाल्थटी आणि शॉन मार्शने किंग्ज इलेव्हनच्या विजयासाठी चांगली झुंज दिली.

वाल्थटीने 33 रन्स केले. तर शॉन मार्शनं शेवटपर्यंत मैदानावर उभं रहात 61 रन्स केले. पण इतर बॅट्समनची साथ त्यांना मिळाली नाही. किंग्ज इलेव्हनचा स्पर्धेतला हा चौथा पराभव ठरला आहे.

मुंबई इंडियन्सची सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू ही फॉर्मात असलेली जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली. ओपनिंगला आलेला डेव्हिड जेकब झटपट आऊट झाला. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडूने 115 रन्सची भक्कम पार्टनरशिप करत मुंबईची इनिंग सावरली.

सचिन तेंडुलकरने 45 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्स मारत 51 रन्स केले. तर अंबाती रायडूनंही शानदार हाफसेच्युरी ठोकली.रायडूने 37 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्स मारत 51 रन्स केले. मुंबईच्या बॉलर्सनेही आज दमदार कामगिरी केली. मुंबईचा मुनाफ पटेल सर्वात यशस्वी बॉलर ठरला.

मुनाफने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स देत 2 विकेट घेतल्या.तर हरभजन सिंगने मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन ऍडम गिलख्रिस्टची विकेट घेत मुंबईला ब्रेक थ्रु मिळवून दिला. हरभजनने 4 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 2 विकेट घेतल्या. मुंबईचा हुकमी बॉलर लसिथ मलिंगानंही 2 विकेट घेत विजयात महत्वाचा वाटा उचलला.

या स्पर्धेत मलिंगाच्या नावावर आता 8 मॅचमध्ये सर्वाधिक 19 विकेटची नोंद झाली आहे. किंग्ज इलेव्हनतर्फे पॉल वाल्थटी आणि शॉन मार्शने चांगली लढत दिली. कॅप्टन गिलख्रिस्ट झटपट आऊट झाल्यावर वाल्थटी आणि मार्शने 72 रन्सची पार्टनरशिप करत विजयासाठी चांगली झुंज दिली. वाल्थटीने 2 सिक्स आणि 1 फोर मारत 33 रन्स केले. तर शार्न मार्शनं 61 रन्सची झुंजार खेळी केली पण टीमला विजय मिळवून देण्यासाठी ती अपुरी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close