S M L

'ऑपरेशन लादेन' थेट व्हाईट हाऊसवरून !

03 मेजगातला सगळ्यात मोठा अतिरेकी ओसामा बिन लादेन काल अमेरिकाच्या हल्ल्याच ठार झाला. अमेरिकेच्या सैन्याच्या ज्या टीमनं ही अंतिम टप्प्यातील कारवाई केली त्या टीमचा कोडवर्ड होता जिरोनिमो. अबोटाबादच्या ज्या घरावर ही कारवाई झाली, त्याची दृश्यं आता उपलब्ध झाली आहेत. या घरामध्ये ओासामा बिन लादेन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याला लादेननं प्रतिकार करायची संधी मिळाली नाही. लादेनला डोक्यात आणि नंतर छातीत गोळ्या घालण्यात आल्या. ओसामाची पत्नीही या हल्ल्यात ठार झाली अशी माहिती समोर येत होती. मात्र ती जखमी झाली असून तिला पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.ओसामा बिन लादेनचा माग काढण्यासाठी अमेरिकेनं बराच वेळ घेतला. आणि या नियोजनबद्ध कारवाईवर थेट लक्ष्य ठेवण्यात आलं होतं व्हाईट हाऊसमधून. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना या कारवाईचे अपडेट्स वेळोवेळी देण्यात येत होते. ओबामा यांच्या सोबत नॅशनल सिक्युरिटी टीमचे सदस्यही होते. त्यांच्यासोबत अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटनही उपस्थित होत्या. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 120 किलोमीटर अंतरावरच्या अबोटाबादमध्ये लादेन राहत असलेल्या घरावर अमेरिकन सैनिकांनी कारवाई केली. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार केल्यानंतर अमेरिकेने अल कायदाच्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेने पेशावर, लाहोर आणि कराचीमधील दूतावास आणि उच्चायुक्तालय तात्पुरती बंद केली आहेत. पण पाकिस्तानात राहणार्‍याअमेरिकन नारिकांसाठी गरज पडली तर ही कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येतील असंही अमेरिकने स्पष्ट केले आहे. ओसामा एवढ्या लोकांचा जीव घेऊ शकतो असं वाटलं नव्हतं !ओसामाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याच्या नातेवाईकांपैकी एकाने प्रतिक्रिया दिली. ओसामाची मेव्हणी कारमेन बिन लादेन यांनी ओसामा एवढ्या लोकांचाजीव घेऊ शकतो असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 08:51 AM IST

'ऑपरेशन लादेन' थेट व्हाईट हाऊसवरून !

03 मे

जगातला सगळ्यात मोठा अतिरेकी ओसामा बिन लादेन काल अमेरिकाच्या हल्ल्याच ठार झाला. अमेरिकेच्या सैन्याच्या ज्या टीमनं ही अंतिम टप्प्यातील कारवाई केली त्या टीमचा कोडवर्ड होता जिरोनिमो. अबोटाबादच्या ज्या घरावर ही कारवाई झाली, त्याची दृश्यं आता उपलब्ध झाली आहेत. या घरामध्ये ओासामा बिन लादेन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याला लादेननं प्रतिकार करायची संधी मिळाली नाही. लादेनला डोक्यात आणि नंतर छातीत गोळ्या घालण्यात आल्या. ओसामाची पत्नीही या हल्ल्यात ठार झाली अशी माहिती समोर येत होती. मात्र ती जखमी झाली असून तिला पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

ओसामा बिन लादेनचा माग काढण्यासाठी अमेरिकेनं बराच वेळ घेतला. आणि या नियोजनबद्ध कारवाईवर थेट लक्ष्य ठेवण्यात आलं होतं व्हाईट हाऊसमधून. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना या कारवाईचे अपडेट्स वेळोवेळी देण्यात येत होते. ओबामा यांच्या सोबत नॅशनल सिक्युरिटी टीमचे सदस्यही होते. त्यांच्यासोबत अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटनही उपस्थित होत्या. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 120 किलोमीटर अंतरावरच्या अबोटाबादमध्ये लादेन राहत असलेल्या घरावर अमेरिकन सैनिकांनी कारवाई केली.

ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार केल्यानंतर अमेरिकेने अल कायदाच्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेने पेशावर, लाहोर आणि कराचीमधील दूतावास आणि उच्चायुक्तालय तात्पुरती बंद केली आहेत. पण पाकिस्तानात राहणार्‍याअमेरिकन नारिकांसाठी गरज पडली तर ही कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येतील असंही अमेरिकने स्पष्ट केले आहे.

ओसामा एवढ्या लोकांचा जीव घेऊ शकतो असं वाटलं नव्हतं !

ओसामाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याच्या नातेवाईकांपैकी एकाने प्रतिक्रिया दिली. ओसामाची मेव्हणी कारमेन बिन लादेन यांनी ओसामा एवढ्या लोकांचाजीव घेऊ शकतो असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close