S M L

अन् पोरांनी केलं रेल्वे रोको आंदोलन

02 मेआंदोलन करणे केवळ मोठ्या लोकांची काम आहेत असं समजलं जायचं पण हा समज आज अमरावती मध्ये चक्क खोटा ठरला. मोठ्या माणसांनी जेवढ्या तीव्रतेनं आंदोलनं केली नसतील तेवढ्या तीव्रतेने आज फासे पारधी समाजाच्या 200 ते 300 मुलांनी आपल्या मागण्यासाठी बेडनेरा रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्सप्रेससह चार मालगाड्या चक्क 1तासभर थांबून ठेवल्या. पारधी समाजाला सरकारी जमिनीचे पट्टे द्यावेत, दहावी पास विद्यार्थ्यांना पोलीस तसेच सैन्यभरतीमध्ये आरक्षण मिळावे याशिवाय 100 टक्के अनुदानित आश्रमशाळा आदिवासीसंस्थेलाच देण्यात याव्या अशा मागण्यासाठी फासेपारधी समाजाच्या वतीनं आज रास्ता रोको केला. आज सकाळी 10 वाजता दोनशे ते तीनशे मुलांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर 4 मालगाड्या व गीतांजली एक्सप्रेस तासभर रोखल्या. या आदिवासी बालकांना हाकलून लावण्यासाठी पोलिसांना शेवटी सौम्य लाठिमार करून या मुलांना बाजूला करावे लागले. या आंदोलनामध्ये 2 वर्ष वयाच्या मुलापासून 15 वयोगटातील मुलाचा सहभाग होता. या मुलांना रेल्वे रुळावरून बाहेर काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 03:35 PM IST

अन् पोरांनी केलं रेल्वे रोको आंदोलन

02 मे

आंदोलन करणे केवळ मोठ्या लोकांची काम आहेत असं समजलं जायचं पण हा समज आज अमरावती मध्ये चक्क खोटा ठरला. मोठ्या माणसांनी जेवढ्या तीव्रतेनं आंदोलनं केली नसतील तेवढ्या तीव्रतेने आज फासे पारधी समाजाच्या 200 ते 300 मुलांनी आपल्या मागण्यासाठी बेडनेरा रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्सप्रेससह चार मालगाड्या चक्क 1तासभर थांबून ठेवल्या.

पारधी समाजाला सरकारी जमिनीचे पट्टे द्यावेत, दहावी पास विद्यार्थ्यांना पोलीस तसेच सैन्यभरतीमध्ये आरक्षण मिळावे याशिवाय 100 टक्के अनुदानित आश्रमशाळा आदिवासीसंस्थेलाच देण्यात याव्या अशा मागण्यासाठी फासेपारधी समाजाच्या वतीनं आज रास्ता रोको केला. आज सकाळी 10 वाजता दोनशे ते तीनशे मुलांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर 4 मालगाड्या व गीतांजली एक्सप्रेस तासभर रोखल्या.

या आदिवासी बालकांना हाकलून लावण्यासाठी पोलिसांना शेवटी सौम्य लाठिमार करून या मुलांना बाजूला करावे लागले. या आंदोलनामध्ये 2 वर्ष वयाच्या मुलापासून 15 वयोगटातील मुलाचा सहभाग होता. या मुलांना रेल्वे रुळावरून बाहेर काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close