S M L

झहीर खान अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत

03 मेयावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटमधून बॉलर झहीर खानचं नाव शर्यतीत आहे. बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला झहीरचं नाव सुचवलं आहे. झहीर हा सध्याच्या भारतीय बॉलिंगचा प्रमुख आधारस्तंभ आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत झहीरने सर्वाधिक 21 विकेट घेत भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी केली होती. याशिवाय गेल्या वर्षी झहीरने 6 टेस्टमध्ये 21 विकेट आणि 20 वन डेमध्ये 38 विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी 2009 मध्ये भारतीय टीमचा ओपनर गौतम गंभीरला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तर गेल्यावर्षी महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 03:57 PM IST

झहीर खान अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत

03 मे

यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटमधून बॉलर झहीर खानचं नाव शर्यतीत आहे. बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला झहीरचं नाव सुचवलं आहे. झहीर हा सध्याच्या भारतीय बॉलिंगचा प्रमुख आधारस्तंभ आहे.

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत झहीरने सर्वाधिक 21 विकेट घेत भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी केली होती. याशिवाय गेल्या वर्षी झहीरने 6 टेस्टमध्ये 21 विकेट आणि 20 वन डेमध्ये 38 विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी 2009 मध्ये भारतीय टीमचा ओपनर गौतम गंभीरला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तर गेल्यावर्षी महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close