S M L

ओसामाच्या कारवाईचं गौडबंगाल ;पाकला मुद्दामच अंधारात ठेवण्यात आलं !

03 मेअमेरिकेनं ओसामा बिन लादेनला ठार तर केलं. पण या कारवाईबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या मदतीशिवाय ओसामा अबोटाबादमध्ये पाच वर्षं कसा राहू शकला हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात आहे. ओसामावरून अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये काही डील झालं का हा प्रश्नही विचारला जातोय. पण ही कारवाई करताना पाकिस्तानला मुद्दामच अंधारात ठेवण्यात आल्याचं अमेरिकेच्या सीआयएच्या प्रमुखांनी सांगितलंय. पाकिस्तानने कारवाईत अडथळा आणू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. आश्चर्य,वेग, आणि हिंसाचार जगातल्या सर्वाधिक वॉन्टेड दहशतवाद्यावरचा हल्ला आणि त्याचा खात्मा अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनं केला. त्याची दृश्यं सर्व जगानं पाहिली. या कारवाईचा प्रत्येक क्षणाचा अहवाल शेकडो मैल दूरवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा घेत होते. पण या कारवाईनंतर अनेक प्रश्नं निर्माण झाली आहेत. पहिला आणि साहजिकच निर्माण होणारा प्रश्न म्हणजे पाकिस्ताननं ओसामाला लपण्यासाठी मदत केली होती काय? अमेरिका यावर बोलायला तयार नाही. पण भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार हे खरं आहे.ए. के. वर्मा म्हणतात, आयएसआयला माहीत होतं की ओसामा नेमका कुठे आहे. त्यांनी कारवाईत अमेरिकेला मदत केली नाही. पण त्याबद्दल त्यांना माहिती होती. ओसामाला किडनीचा आजार होता. त्याला आठवड्यातून दोन वेळा डायलसिस करण्याची गरज होती. त्यासाठी त्याला चांगल्या डॉक्टरची गरज होती. हा डॉक्टर आणि साहित्य कोण पाठवत होतं.?दुसरा प्रश्न आहे, पाकिस्तानचा या कारवाईत सहभाग होता का ? पण पाकिस्तानातल्या प्रतिष्ठीत वर्तमानपत्र डॉननं वेगळीच शंका व्यक्त केली आहे. काही मुद्द्यावर वर्तमानपत्रानं संशय व्यक्त केला आहे.- इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टंट फोर्सचे (आयएसएएफ) कमांडर जनरल पेट्रॉस यांनी रावळपिंडीतील चकाला एअरबेसला गेल्या गुरुवारी भेट दिली होती- पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशी पेट्रॉस यांनी चर्चा केली - पाकिस्तान कॉर्प्स कमांडर्सची त्यांनी अचानक भेट घेतली- कॉर्प्सचे कमांडर नसूनही आयएसआयचे प्रमुख जनरल शुजा पाशा या बैठकीला उपस्थित होते. शेवटचा प्रश्न हा आहे की ओसामाला संपवण्यात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एखादी डील झालेली आहे का? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान ओसामाचा कार्ड म्हणून वापर करत होतं.ओसामाच्या बदल्यात अमेरिकेकडून काहीतरी पदरात पाडून घेणं हा पाकिस्तानचा डाव होता. आता अफगाणिस्तानमध्ये निर्णायक भूमिकेची मागणी पाकिस्ताननं केली असण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2011 05:32 PM IST

ओसामाच्या कारवाईचं गौडबंगाल ;पाकला मुद्दामच अंधारात ठेवण्यात आलं !

03 मे

अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला ठार तर केलं. पण या कारवाईबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या मदतीशिवाय ओसामा अबोटाबादमध्ये पाच वर्षं कसा राहू शकला हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात आहे. ओसामावरून अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये काही डील झालं का हा प्रश्नही विचारला जातोय. पण ही कारवाई करताना पाकिस्तानला मुद्दामच अंधारात ठेवण्यात आल्याचं अमेरिकेच्या सीआयएच्या प्रमुखांनी सांगितलंय. पाकिस्तानने कारवाईत अडथळा आणू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.

आश्चर्य,वेग, आणि हिंसाचार जगातल्या सर्वाधिक वॉन्टेड दहशतवाद्यावरचा हल्ला आणि त्याचा खात्मा अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनं केला. त्याची दृश्यं सर्व जगानं पाहिली. या कारवाईचा प्रत्येक क्षणाचा अहवाल शेकडो मैल दूरवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा घेत होते.

पण या कारवाईनंतर अनेक प्रश्नं निर्माण झाली आहेत. पहिला आणि साहजिकच निर्माण होणारा प्रश्न म्हणजे पाकिस्ताननं ओसामाला लपण्यासाठी मदत केली होती काय? अमेरिका यावर बोलायला तयार नाही. पण भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार हे खरं आहे.

ए. के. वर्मा म्हणतात, आयएसआयला माहीत होतं की ओसामा नेमका कुठे आहे. त्यांनी कारवाईत अमेरिकेला मदत केली नाही. पण त्याबद्दल त्यांना माहिती होती. ओसामाला किडनीचा आजार होता. त्याला आठवड्यातून दोन वेळा डायलसिस करण्याची गरज होती. त्यासाठी त्याला चांगल्या डॉक्टरची गरज होती. हा डॉक्टर आणि साहित्य कोण पाठवत होतं.?

दुसरा प्रश्न आहे, पाकिस्तानचा या कारवाईत सहभाग होता का ? पण पाकिस्तानातल्या प्रतिष्ठीत वर्तमानपत्र डॉननं वेगळीच शंका व्यक्त केली आहे. काही मुद्द्यावर वर्तमानपत्रानं संशय व्यक्त केला आहे.

- इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टंट फोर्सचे (आयएसएएफ) कमांडर जनरल पेट्रॉस यांनी रावळपिंडीतील चकाला एअरबेसला गेल्या गुरुवारी भेट दिली होती- पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशी पेट्रॉस यांनी चर्चा केली - पाकिस्तान कॉर्प्स कमांडर्सची त्यांनी अचानक भेट घेतली- कॉर्प्सचे कमांडर नसूनही आयएसआयचे प्रमुख जनरल शुजा पाशा या बैठकीला उपस्थित होते.

शेवटचा प्रश्न हा आहे की ओसामाला संपवण्यात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एखादी डील झालेली आहे का? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान ओसामाचा कार्ड म्हणून वापर करत होतं.ओसामाच्या बदल्यात अमेरिकेकडून काहीतरी पदरात पाडून घेणं हा पाकिस्तानचा डाव होता. आता अफगाणिस्तानमध्ये निर्णायक भूमिकेची मागणी पाकिस्ताननं केली असण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2011 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close