S M L

'ऑपरेशन लादेन' पाकिस्तान उघड करण्याची होती भीती !

04 मेओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर आता त्याच्याविरुद्धच्या कारवाईबाबत नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी जेव्हा ओसामाला ठार केलं तेव्हा तो निशस्त्र होता अशी माहिती आता व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. पण त्याचे फोटो अतिशय भयंकर असल्याने ते प्रसिद्ध केले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान ओसामाविरोधातील कारवाईची माहिती पाकिस्तानला आधी दिली असती तर ही माहिती ओसामापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानला माहिती दिली नाही असं स्पष्टीकरण सीआयएच्या प्रमुखांनी टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत केलंय. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज फ्रान्समध्ये बिझनेस फोरमला संबोधित केलं पण ओसामा प्रकरणाबद्दल बोलणं त्यांनी टाळलं. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद, हा विचार चुकीचा असल्याचा दावा मात्र त्यांनी केला. -

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 09:55 AM IST

'ऑपरेशन लादेन' पाकिस्तान उघड करण्याची होती भीती !

04 मे

ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर आता त्याच्याविरुद्धच्या कारवाईबाबत नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी जेव्हा ओसामाला ठार केलं तेव्हा तो निशस्त्र होता अशी माहिती आता व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

पण त्याचे फोटो अतिशय भयंकर असल्याने ते प्रसिद्ध केले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान ओसामाविरोधातील कारवाईची माहिती पाकिस्तानला आधी दिली असती तर ही माहिती ओसामापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानला माहिती दिली नाही असं स्पष्टीकरण सीआयएच्या प्रमुखांनी टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत केलंय.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज फ्रान्समध्ये बिझनेस फोरमला संबोधित केलं पण ओसामा प्रकरणाबद्दल बोलणं त्यांनी टाळलं. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद, हा विचार चुकीचा असल्याचा दावा मात्र त्यांनी केला. -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close