S M L

आघाडीची समन्वय समितीची बैठक

04 मेआघाडी सरकारमधील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज एकत्र बैठक घेणार आहे. या समन्वयाच्या बैठकीत महामंडळ आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक विषयावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद रंगण्याचीही चिन्ह दिसत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अनेकवेळा जाहीर वाद झाले. आमदार निधी असेल किंवा पाणीवाटपाच्या विधेयकाचा प्रश्न असेल अशा काही महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला नमवलं. राष्ट्रवादीवर दडपण आणून पाणीवाटपाचा क्रम मुख्यमंत्र्यांनी बदलवून घेतला असा दावा करायला काँग्रेसने सुरवात केली. पण काँग्रेसचा हा दावा राष्ट्रवादीला मान्य नाही. याबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक होतेय. या बैठकीमध्ये अनेक प्रश्नावर राष्ट्रवादीला काँग्रेसकडून उत्तर हवं आहे.महामंडळ आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्या, प्रलंबित फाईलींचा निपटारा राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप, प्रभाग समितीबाबत धोरण निश्चित करणे, मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा अनेक विषयावर आघाडीच्या नेत्यांना समन्वय साधायचा आहे. आघाडीमध्ये अनेक मुद्यावर वाद आहेत पण ते राज्यस्तरावरच मिटविले जावेत असं दोन्ही पक्षांच्या हायकमांडला वाटतंय. त्यामुळेच समन्वयाच्या बैठकीत अनेक विषय मार्गा लागतील अशी अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 10:55 AM IST

आघाडीची समन्वय समितीची बैठक

04 मे

आघाडी सरकारमधील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज एकत्र बैठक घेणार आहे. या समन्वयाच्या बैठकीत महामंडळ आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक विषयावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद रंगण्याचीही चिन्ह दिसत आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अनेकवेळा जाहीर वाद झाले. आमदार निधी असेल किंवा पाणीवाटपाच्या विधेयकाचा प्रश्न असेल अशा काही महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला नमवलं. राष्ट्रवादीवर दडपण आणून पाणीवाटपाचा क्रम मुख्यमंत्र्यांनी बदलवून घेतला असा दावा करायला काँग्रेसने सुरवात केली.

पण काँग्रेसचा हा दावा राष्ट्रवादीला मान्य नाही. याबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक होतेय. या बैठकीमध्ये अनेक प्रश्नावर राष्ट्रवादीला काँग्रेसकडून उत्तर हवं आहे.

महामंडळ आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्या, प्रलंबित फाईलींचा निपटारा राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप, प्रभाग समितीबाबत धोरण निश्चित करणे, मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा अनेक विषयावर आघाडीच्या नेत्यांना समन्वय साधायचा आहे.

आघाडीमध्ये अनेक मुद्यावर वाद आहेत पण ते राज्यस्तरावरच मिटविले जावेत असं दोन्ही पक्षांच्या हायकमांडला वाटतंय. त्यामुळेच समन्वयाच्या बैठकीत अनेक विषय मार्गा लागतील अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close