S M L

राजकारणाच्या भांडणात तोटा एपीएमसी बाजारपेठेचा !

04 मेआशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेकडे पाहिलं जातं. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ही बाजारपेठ नेहमीच वादाची भोवर्‍यात असते. आता तर राज्यातील 2 बड्या नेत्यांच्या वादामुळे बाजारपेठेच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. मागील 3 महिन्यापासून बाजार समितीच्या सभापती आणि सचिवांच कार्यालय नेहमी बंदच असतात.नवी मुंबईतील एपीएमसी या बाजारपेठेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व आहे. मुळा-प्रवराच्या निर्णयानंतर दादांचे कट्टर विरोधक बनलेले पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे या एपीएमसी खात्याची जबाबदारी आहे. एपीएमसीचे सभापती बाळासाहेब सोळसकर हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात आणि बाजार समितीचे सचिव शरद जरे हे राधाकृष्ण विखे-पाटलांचे अगदी जवळचे. वाद दोन नेत्यांमध्ये झाला पण त्याचा परिणाम होतोय तो बाजारसमितीच्या कामकाजावर कारण नेत्यांच्या वादामुळे सचिव आणि सभापती एकमेकांचे तोंडही पाहत नाही आणि त्यामुळे कोणतीही बैठक किंवा निर्णय घेतले जात नाहीत. संचालक मंडळाची जर बैठक झालीच तर झालेल्या निर्णयांवर अंमलबजावणी होत नाही. एकंदरित एपीएमसीला कोणी वालीच उरला नसल्याचं वातावरण आहे.पंधरा दिवसांपासून संचालक मंडळ सचिवांची बदली करण्यामधे गुंतले आहे आणि ही बदली झाल्या शिवाय सभापती एपीएमसीमध्ये पाय ठेवणार नाहीत. तर पणन विभाग हे संचालक मंडळ बरखास्त व्हावे ह्या साठी प्रयत्नशील आहेत. ह्या दोन प्रशासनात फोफावतोय तो फक्त भ्रष्टाचार.उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्र्यांमधला वाद, त्यामुळे सचिव आणि सभापती यांच्यात छत्तीसचा आकडा, अशा परिस्थितीत एपीएमसीमध्ये अवैध व्यापार अणि भ्रष्टाचाराचे राज्य निर्माण झालंय. यापूर्वीसुध्दा संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे प्रशासकाच्या हाती एपीएमसीचा कारभार सोपवण्याची वेळ आलेली होती. आणि म्हणूनच सध्या माजलेल्या बजबजपुरीमुळे एपीएमसीवर पुन्हा प्रशासकाची नेमणूक करावी या मागणीनं जोर धरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 01:59 PM IST

राजकारणाच्या भांडणात तोटा एपीएमसी बाजारपेठेचा !

04 मे

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेकडे पाहिलं जातं. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ही बाजारपेठ नेहमीच वादाची भोवर्‍यात असते. आता तर राज्यातील 2 बड्या नेत्यांच्या वादामुळे बाजारपेठेच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. मागील 3 महिन्यापासून बाजार समितीच्या सभापती आणि सचिवांच कार्यालय नेहमी बंदच असतात.

नवी मुंबईतील एपीएमसी या बाजारपेठेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व आहे. मुळा-प्रवराच्या निर्णयानंतर दादांचे कट्टर विरोधक बनलेले पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे या एपीएमसी खात्याची जबाबदारी आहे. एपीएमसीचे सभापती बाळासाहेब सोळसकर हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात आणि बाजार समितीचे सचिव शरद जरे हे राधाकृष्ण विखे-पाटलांचे अगदी जवळचे.

वाद दोन नेत्यांमध्ये झाला पण त्याचा परिणाम होतोय तो बाजारसमितीच्या कामकाजावर कारण नेत्यांच्या वादामुळे सचिव आणि सभापती एकमेकांचे तोंडही पाहत नाही आणि त्यामुळे कोणतीही बैठक किंवा निर्णय घेतले जात नाहीत. संचालक मंडळाची जर बैठक झालीच तर झालेल्या निर्णयांवर अंमलबजावणी होत नाही. एकंदरित एपीएमसीला कोणी वालीच उरला नसल्याचं वातावरण आहे.

पंधरा दिवसांपासून संचालक मंडळ सचिवांची बदली करण्यामधे गुंतले आहे आणि ही बदली झाल्या शिवाय सभापती एपीएमसीमध्ये पाय ठेवणार नाहीत. तर पणन विभाग हे संचालक मंडळ बरखास्त व्हावे ह्या साठी प्रयत्नशील आहेत. ह्या दोन प्रशासनात फोफावतोय तो फक्त भ्रष्टाचार.

उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्र्यांमधला वाद, त्यामुळे सचिव आणि सभापती यांच्यात छत्तीसचा आकडा, अशा परिस्थितीत एपीएमसीमध्ये अवैध व्यापार अणि भ्रष्टाचाराचे राज्य निर्माण झालंय.

यापूर्वीसुध्दा संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे प्रशासकाच्या हाती एपीएमसीचा कारभार सोपवण्याची वेळ आलेली होती. आणि म्हणूनच सध्या माजलेल्या बजबजपुरीमुळे एपीएमसीवर पुन्हा प्रशासकाची नेमणूक करावी या मागणीनं जोर धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close