S M L

लादेन 5 वर्ष कसा राहिला याची उत्तर पाकिस्तानने द्यावी !

04 मेओसामाच्या मृत्यूनंतर आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय. पाकिस्तानी लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या अगदी जवळ ओसामा बिन लादेन तब्बल पाच वर्षं कसा राहिला याचं उत्तर पाकिस्तानने द्यावे अशी मागणी फ्रान्स आणि इंग्लंडने केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा यांच्या भेटीदरम्यान हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ऍलेन जुपे यांनी सांगितले. तर ओसामाला लपण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याचा आरोप इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केला. अमेरिकेलासुद्धा असाच संशय आहे. पण सध्या अमेरिका आणि पाकिस्तानने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचं टाळलंय. ओसामा राहत असलेलं अबोटाबादमधीलं अलिशान घर बांधणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला अटक करण्यात आल्याचे समजतंय. गुल मोहम्मद उर्फ मिथू खान असं त्याचं नाव आहे. अबोटाबादजवळ असलेल्या बिलाल टाऊनमधून त्याला अटक करण्यात आल्याची बातमी पाकिस्तानातल्या न्यूज चॅनल्सनी दिलीय. त्यानंतर त्याला अज्ञात ठिकाणी चौकशीसाठी नेण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 05:39 PM IST

लादेन 5 वर्ष कसा राहिला याची उत्तर पाकिस्तानने द्यावी !

04 मे

ओसामाच्या मृत्यूनंतर आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय. पाकिस्तानी लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या अगदी जवळ ओसामा बिन लादेन तब्बल पाच वर्षं कसा राहिला याचं उत्तर पाकिस्तानने द्यावे अशी मागणी फ्रान्स आणि इंग्लंडने केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा यांच्या भेटीदरम्यान हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ऍलेन जुपे यांनी सांगितले. तर ओसामाला लपण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याचा आरोप इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केला. अमेरिकेलासुद्धा असाच संशय आहे. पण सध्या अमेरिका आणि पाकिस्तानने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचं टाळलंय.

ओसामा राहत असलेलं अबोटाबादमधीलं अलिशान घर बांधणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला अटक करण्यात आल्याचे समजतंय. गुल मोहम्मद उर्फ मिथू खान असं त्याचं नाव आहे. अबोटाबादजवळ असलेल्या बिलाल टाऊनमधून त्याला अटक करण्यात आल्याची बातमी पाकिस्तानातल्या न्यूज चॅनल्सनी दिलीय. त्यानंतर त्याला अज्ञात ठिकाणी चौकशीसाठी नेण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close