S M L

लादेन सोबत होती त्याची लाडकी बायको !

04 मेओसामा बिन लादेन यांच्या सोबत राहणार्‍या त्याच्या एका पत्नीची ओळख पटली आहे. ओसामाला होत्या एकूण पाच बायका आणि त्यांच्यापासून होती 23 मुलं. पाच पत्नींपैकी केवळ एक पत्नीच पाकिस्तानमध्ये ओसामाबरोबर राहत होती. 29 वर्षांच्या या अमल अहमद अब्दुल फताह असं नाव असलेली ही पत्नी ओसामाची सर्वात लाडकी होती असंही म्हणतात. एबीसी नेटवर्कच्या माहितीनुसार ओसामाने एका पत्नीबरोबर तलाक घेतला होता. ओसामा जेव्हा पाकिस्तनला निघून आला त्याआधी इतर तीन पत्नींनी सिरीयामध्ये आश्रय घेतला होता. पण अमल मात्र ओसामाबरोबरच राहत होती. अमेरिकन सैनिकांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा अमल ही ओसामाबरोबर बेडरुममध्ये होती. अमेरिकन सैनिक बेडरुममध्ये घुसले तेव्हा अमल प्रचंड घाबरली आणि आरडाओरडा करायला लागली म्हणून सीआयएनं तिच्या पायावर गोळी मारली, ज्यामध्ये ती जखमी झालेली आहे. आता ही अमल कुठे आहे तिच्यावर कुठे उपचार सुरु आहेत आणि तिची प्रकृती कशी आहे याची माहिती मात्र अमेरिकेने दिलेली नाही. ओसामाचा खात्मा झाल्यानंतर अमेरिकन अधिकारी ऑपरेशन ओसामाबद्दल नवीन माहिती जाहीर करत आहे. जेव्हा ओसामाच्या मृतदेहाचा तपास केला तेव्हा रोख पाचशे युरो आणि दोन टेलिफोन नंबर्स लिहीलेला कागद अंगावरील कपड्यांमधील बाह्यांमध्ये शिवण मारुन ठेवलेला सापडला. कुठेही पळ काढायची वेळ आली तरी लादेन सदैव तयार असायचा हेच यावरुन दिसून येतंय. ओसामाला आपल्या नेटवर्कवर मोठा विश्वास होता. कुणी हल्ला केलाच तर आपले साथीदार आपल्याला नक्की सतर्क करतील याची लादेनला नेहमीच खात्री असायची. पण सीआयएचं ऑपरेशन एवढं फूलप्रुफ असावं की लादेनच्या पूर्ण नेटवर्कला कसलाही सुगावा लागला नाही. अर्थात लादेनकडे सापडलेले दोन टेलिफोन नंबर्स कोणाचे याचा तपास अजून सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 05:45 PM IST

लादेन सोबत होती त्याची लाडकी बायको !

04 मे

ओसामा बिन लादेन यांच्या सोबत राहणार्‍या त्याच्या एका पत्नीची ओळख पटली आहे. ओसामाला होत्या एकूण पाच बायका आणि त्यांच्यापासून होती 23 मुलं. पाच पत्नींपैकी केवळ एक पत्नीच पाकिस्तानमध्ये ओसामाबरोबर राहत होती. 29 वर्षांच्या या अमल अहमद अब्दुल फताह असं नाव असलेली ही पत्नी ओसामाची सर्वात लाडकी होती असंही म्हणतात.

एबीसी नेटवर्कच्या माहितीनुसार ओसामाने एका पत्नीबरोबर तलाक घेतला होता. ओसामा जेव्हा पाकिस्तनला निघून आला त्याआधी इतर तीन पत्नींनी सिरीयामध्ये आश्रय घेतला होता. पण अमल मात्र ओसामाबरोबरच राहत होती. अमेरिकन सैनिकांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा अमल ही ओसामाबरोबर बेडरुममध्ये होती.

अमेरिकन सैनिक बेडरुममध्ये घुसले तेव्हा अमल प्रचंड घाबरली आणि आरडाओरडा करायला लागली म्हणून सीआयएनं तिच्या पायावर गोळी मारली, ज्यामध्ये ती जखमी झालेली आहे. आता ही अमल कुठे आहे तिच्यावर कुठे उपचार सुरु आहेत आणि तिची प्रकृती कशी आहे याची माहिती मात्र अमेरिकेने दिलेली नाही.

ओसामाचा खात्मा झाल्यानंतर अमेरिकन अधिकारी ऑपरेशन ओसामाबद्दल नवीन माहिती जाहीर करत आहे. जेव्हा ओसामाच्या मृतदेहाचा तपास केला तेव्हा रोख पाचशे युरो आणि दोन टेलिफोन नंबर्स लिहीलेला कागद अंगावरील कपड्यांमधील बाह्यांमध्ये शिवण मारुन ठेवलेला सापडला.

कुठेही पळ काढायची वेळ आली तरी लादेन सदैव तयार असायचा हेच यावरुन दिसून येतंय. ओसामाला आपल्या नेटवर्कवर मोठा विश्वास होता. कुणी हल्ला केलाच तर आपले साथीदार आपल्याला नक्की सतर्क करतील याची लादेनला नेहमीच खात्री असायची. पण सीआयएचं ऑपरेशन एवढं फूलप्रुफ असावं की लादेनच्या पूर्ण नेटवर्कला कसलाही सुगावा लागला नाही. अर्थात लादेनकडे सापडलेले दोन टेलिफोन नंबर्स कोणाचे याचा तपास अजून सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close