S M L

मुंबई पुन्हा पुण्यावर भारी

04 मेअखेर मुंबई आणि पुणे टीम दरम्यानची दुसरी मॅचही मुंबईने जिंकली आहे. पुणे टीमसाठी हा सलग सातवा पराभव ठरला आहे. मुंबई टीमचं सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व होतं. ओपनर एडन ब्लिझार्ड झटपट आऊट झाला. पण अंबाती रायडू, कॅप्टन सचिन यांनी इनिंग सावरली. त्यानंतर रोहीत शर्मा लगेच आऊट झाला. पण टी सुमन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मुंबईचा स्कोअर वाढवला. पोलार्डने 21 बॉलमध्ये 28 रन केले. त्याच्या जोरावरच मुंबईने 160 रनचा टप्पा ओलांडला. याला उत्तर देताना पुण्याची सुरुवात मात्र खराब झाली. मनिष पांडेने हाफ सेंच्युरी केली. आणि युवराजने 20 रन केले. पण त्या व्यतिरिक्त इतर बॅट्समन कमाल करु शकले नाहीत. आणि निर्धारित वीस ओव्हरमध्ये त्यांची टीम 7 विकेटवर 139 रन करु शकली. मुंबई टीमचा हा सातवा विजय ठरला. आणि पॉइंट टेबलमध्ये त्यांनी पुन्हा आघाडी घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 06:28 PM IST

मुंबई पुन्हा पुण्यावर भारी

04 मे

अखेर मुंबई आणि पुणे टीम दरम्यानची दुसरी मॅचही मुंबईने जिंकली आहे. पुणे टीमसाठी हा सलग सातवा पराभव ठरला आहे. मुंबई टीमचं सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व होतं. ओपनर एडन ब्लिझार्ड झटपट आऊट झाला. पण अंबाती रायडू, कॅप्टन सचिन यांनी इनिंग सावरली. त्यानंतर रोहीत शर्मा लगेच आऊट झाला.

पण टी सुमन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मुंबईचा स्कोअर वाढवला. पोलार्डने 21 बॉलमध्ये 28 रन केले. त्याच्या जोरावरच मुंबईने 160 रनचा टप्पा ओलांडला. याला उत्तर देताना पुण्याची सुरुवात मात्र खराब झाली. मनिष पांडेने हाफ सेंच्युरी केली. आणि युवराजने 20 रन केले. पण त्या व्यतिरिक्त इतर बॅट्समन कमाल करु शकले नाहीत. आणि निर्धारित वीस ओव्हरमध्ये त्यांची टीम 7 विकेटवर 139 रन करु शकली. मुंबई टीमचा हा सातवा विजय ठरला. आणि पॉइंट टेबलमध्ये त्यांनी पुन्हा आघाडी घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close