S M L

सौरवच क्रिकेट करिअर अफलातून होतं- सचिन

10 नोव्हेंबर नागपूर सौरव गांगुली नागपूर टेस्ट मॅचनंतर रिटायर्ड होतोय. त्यानिमित्तानं सौरवच्या कारकीर्दीविषयी आणि त्याच्यासोबतच्या आठवणीविषयी आमचा रिपोर्टर विमल कुमार यानं सचिनशी खास बातचीत केली.सचिन आणि सौरभ या जोडगोळीने भारताला अनेक विजय मिळवून दिलेच सोबत अनेक विक्रमही केले. दोघांनी भारताचं नेतृत्वही केलंय. इतके वर्ष एकत्र खेळल्यानंतर सौरभ विषयी सचिन सांगतो, सौरभ केवळ माझा साथीदारचं नव्हता तर तो भारताच्या टीममधला एक मुख्य प्लेअरही होता. भारतीय क्रिकेट मधलं त्याचं योगदान फार मोठं आहे. त्याचं क्रिकेट करिअर अफलातून होतचं. सौरवच्या निवृत्तीमुळे भारतीय टीमलाच नव्हे तर सा-या क्रिकेट जगताला त्याची उणीव नक्की जाणवेल. यशस्वी भारतीय कॅप्टन सोबत अनेक विजयात सौरवचा मोठा हातभार आहे. मी इतकंच म्हणेल असा प्रतिभावान खेळाडू यानंतर आमच्या सोबत नसणार.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2008 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2008 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close