S M L

गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला सुरुवात

05 मेनाशिकच्या गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला आता सुरुवात झाली आहे. गोदापात्रातल्या या प्रदुषणाबद्दल आयबीएन लोकमतने आवाज उठवला होता. या प्रदुषणाची प्राथमिक जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या वतीने महापौरांनी गोदापात्राच्या परिसराची पाहणी केली. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही गोदापात्राची स्वच्छता झाली नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. तर महापौरांच्या या दौर्‍यावर उपमहापौरांनीच टीका केली. गोदावरी स्वच्छतेचं काम इरिगेशन डिपार्टमेंटचं असल्याचं सांगत महापालिका आयुक्तांनी आपले हात वर केले. खरं तर गोदापात्रात मिसळणारं महापालिकेच्या ड्रेनेजचं पाणी थांबवणं ही महापालिकेची जबाबदारी असताना ते सोडून यावेळीही जेसीबीने पाणवेली काढण्याचा दिखाऊ आणि खर्चिक उद्योग महापालिका प्रशासन करतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 10:18 AM IST

गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला सुरुवात

05 मे

नाशिकच्या गोदापात्रातला पाणवेलींचा विळखा काढायला आता सुरुवात झाली आहे. गोदापात्रातल्या या प्रदुषणाबद्दल आयबीएन लोकमतने आवाज उठवला होता. या प्रदुषणाची प्राथमिक जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या वतीने महापौरांनी गोदापात्राच्या परिसराची पाहणी केली. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही गोदापात्राची स्वच्छता झाली नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

तर महापौरांच्या या दौर्‍यावर उपमहापौरांनीच टीका केली. गोदावरी स्वच्छतेचं काम इरिगेशन डिपार्टमेंटचं असल्याचं सांगत महापालिका आयुक्तांनी आपले हात वर केले. खरं तर गोदापात्रात मिसळणारं महापालिकेच्या ड्रेनेजचं पाणी थांबवणं ही महापालिकेची जबाबदारी असताना ते सोडून यावेळीही जेसीबीने पाणवेली काढण्याचा दिखाऊ आणि खर्चिक उद्योग महापालिका प्रशासन करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close