S M L

जळगावमध्ये आंबे पिकवण्यासाठी कार्बाईड पावडरचा वापर

05 मेजळगावच्या फळ बाजारपेठेत आवक झालेल्या आंब्यांची महापालिकेनं अचानक तपासणी सुरु केल्याने व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत तातडीनं आंबा पिकवण्यासाठी कार्बाईड पावडर चा वापर होत असल्याचे उघडकीस आलं आहे. जवळपास 15 टन आबांच्या आतापर्यत तपासणी करण्यात आली आहे. या मध्ये प्रत्येक क्रेटमध्ये कार्बाईड पावडरच्या पुड्या आढळल्या आहेत. पोटाचे विकार या कार्बाईडनं तर होतातंच पण कॅन्सर होण्याचीही शक्यता असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणं आहे.अजूनही ही तपासणी सुरुच आहे. यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. गोलाणी मार्केट मध्ये आज अक्षयतृतीयनिमित्त आंबा खरेदीला मोठी गर्दी झाली. मात्र आंबा खाल्यानंतर काही जणांना त्रास होवू लागल्याने त्यांनी तक्रार केली.पालिकेच्या आरोग्य विभागाने या तक्रारीच्या आधारावर या तपासणीला सुरुवात झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 11:24 AM IST

जळगावमध्ये आंबे पिकवण्यासाठी कार्बाईड पावडरचा वापर

05 मे

जळगावच्या फळ बाजारपेठेत आवक झालेल्या आंब्यांची महापालिकेनं अचानक तपासणी सुरु केल्याने व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत तातडीनं आंबा पिकवण्यासाठी कार्बाईड पावडर चा वापर होत असल्याचे उघडकीस आलं आहे.

जवळपास 15 टन आबांच्या आतापर्यत तपासणी करण्यात आली आहे. या मध्ये प्रत्येक क्रेटमध्ये कार्बाईड पावडरच्या पुड्या आढळल्या आहेत. पोटाचे विकार या कार्बाईडनं तर होतातंच पण कॅन्सर होण्याचीही शक्यता असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणं आहे.अजूनही ही तपासणी सुरुच आहे. यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

गोलाणी मार्केट मध्ये आज अक्षयतृतीयनिमित्त आंबा खरेदीला मोठी गर्दी झाली. मात्र आंबा खाल्यानंतर काही जणांना त्रास होवू लागल्याने त्यांनी तक्रार केली.पालिकेच्या आरोग्य विभागाने या तक्रारीच्या आधारावर या तपासणीला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close